Village Wrestling : बोरगावच्या बलभीम तालमीचा डंका; अनेकांना मिळाली आयुष्याची भाकरी

कृष्णा काठावरील समृद्ध बोरगाव (ता. वाळवा) गावात मल्लविद्येची अखंड परंपरा जपली जात आहे.
wrestling of village
wrestling of villagesakal
Updated on

नवेखेड : कृष्णा काठावरील समृद्ध बोरगाव (ता. वाळवा) गावात मल्लविद्येची अखंड परंपरा जपली जात आहे. कृष्णेच्या पाण्याला लाल मातीची जोड मिळाल्याने इथे घराघरांत पैलवान घडले. शेकडो पैलवान घडवणारी बलभीम तालीमचा नावलौकिक आहे.

काळी कसदार जमीन, बागायती शेती, जातिवंत पशुधन यासह घरटी पैलवान अशी या गावची ओळख. दिग्गज मल्लांनी ताकद, शक्ती, युक्ती व बुद्धीच्या जोरावर भल्या-भल्यांना पाणी पाजलेय. आरोग्यसंपन्न ठेवण्यात याच मातीचा जिव्हाळा उपयोगी ठरत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.

बोरगाव हे वाळवा तालुक्यातील सधन, समृद्ध गाव. मल्लविद्येची मोठी परंपरा या गावाला लाभली आहे. पूर्वी पूर्वेकडील व पश्चिमेकडील अशा गावांत दोन तालमी होत्या. पूर्व बाजूला बलभीम तालीम. रामू पैलवान हे स्वातंत्र्यपूर्व काळातील नामांकित मल्ल होते.

त्यावेळी घाटाखालील व घाटावरील अशी प्रत्येक गोष्टीत ईर्ष्या असे. रामू पैलवान यांच्यानंतर मारुती तात्या पाटील, गणपती नाना शिंदे, सोनबा गुरुजी, मोहनअण्णा पाटील, जी. बी. शिंदे, शंकर सुतार यांनी पैलवानकीचे धडे नेटाने गिरवले.

त्यानंतर आनंदराव सलगर, ज्ञानू माने, आनंदराव शिंदे, रघुनाथ शिंदे, विष्णुपंत शिंदे, साहेबराव बापू या मल्लांची मांदियाळी घडली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मानसिंगबापू पाटील, जयवंत शिंदे, रामा माने, जगदीश पाटील, गणपती गिरीगोसावी या मल्लांनी कुस्ती वैभवात भर घातली. भीमराव चाचे, चाँद पठाण (जुनेखेड), वसंत शिंदे, मोहन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नजरुद्दीन नायकवडी यांनी ही माती गाजवली. जोतिराम झेंडे, कुमार शिंदे, बाळू देसाई, अविनाश शिंदे, अरुण वाटेगावकर, बबन सलगर, उत्तम शिंदे यांनी काही काळ गाजवला.

विलास शिंदे, धोंडिराम जाधव, दीपक शिंदे, विनायक पाटील, भगवान पाटील, संजय माने, तानाजी गिरीगोसावी, अजित शिंदे, उमेश पाटील, मानाजी पाटील हेदेखील अव्वल ठरले. १९९३ साली पडझड झालेल्या या तालमीचे नूतनीकरण करण्यात आले. बलभीम तालीम मंडळ या नावाने रितसर नोंदणी करण्यात आली.

अनेकजण पैलवानकीतील प्रावीण्याच्या जोरावर पोलिस व सैन्य दलात भरती होऊन सेवारत आहेत. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँका, दूध संघात सेवा बजावत आहेत. नितीन शिंदे, नितीन सलगर, अभिजित पवार, जटाप्पा लोणार, पंडित झेंडे, आशिष पाटील, रोहित फार्णे-पाटील, संदीप नागरे, प्रशांत शिंदे, शाबाज आवटी, प्रवीण पाटील, जयंत वाटेगावकर, संपत देसाई, पृथ्वीराज पाटील, परशुराम वंजारी, संभाजी पाटील, सागर पाटील, मुकुंद लोंढे, कृष्णात वाटेगावकर, सचिन शिंदे, नागेश गुरव, श्रीकांत चव्हाण, राजेश फार्णे, शामराव वाळके, बबन गावडे, सूरज गावडे, सागर झेंडे, रणजित सूर्यवंशी या मल्लांचा सहभाग राहिला.

आजमितीला शंभूराज पाटील, वैभव पाटील, अमोल पाटील यांच्यासह मल्ल सराव करीत आहेत. त्यांना विलास शिंदे, विनायक पाटील यांचे सहकार्य आहे. परिसरात बंद पडलेल्या तालमी, कुस्ती मैदाने पुन्हा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी तालमीला एक लाख रुपयांची मॅट दिली आहे.

चौथ्‍या पिढीने जपलीय परंपरा...

जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी राहिलेल्या स्व. मानसिंगबापूच्या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या मल्लविद्येची परंपरा जोपासली जात आहे. त्यांचे वडील सोनबा गुरुजी, नंतर स्वतः मानसिंगबापू, विकास पाटील, विनायक पाटील, आशिष पाटील व सध्या शंभूराज पाटील, सारंग पाटील अशी चौथी पिढी लाल मातीत कार्यरत आहे.

कुस्तीमुळे जीवनात स्थिरता लाभलेल्या मल्लांनी ही कुस्ती वाढावी, टिकावी यासाठी जाणीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. घरात एखादा पैलवान घडवण्यासाठी आग्रह धरायला हवा. चांगली परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाने मल्लविद्येचा संस्कार पेरायला हवा.

- विकास पाटील,

मार्गदर्शक, बलभीम तालीम मंडळ, बोरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.