बेळगाव : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची प्रतीक्षा, शिक्षण खात्याचे वेट अँड वॉच

डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही
timetable of 10th and 12th examinations has not been announced yet
timetable of 10th and 12th examinations has not been announced yetsakal
Updated on

बेळगाव : डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र शिक्षण खात्याने सध्या वेळापत्रक जाहीर करण्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. तसेच वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जाते. (December has come to an end the timetable of 10th and 12th examinations has not been announced yet)

timetable of 10th and 12th examinations has not been announced yet
देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त

तर आक्षेप मागविण्यात आलेल्या काही दिवसानंतर परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत या वेळी लवकर वेळापत्रक जाहीर करून देखील अध्याप दहावी किंवा बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षेच्या वेळा पत्रकाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे परिक्षण असताना बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. तर यावेळी दहावीची परीक्षा ओएमआर सीटवर घेण्यात आली होती. मात्र यावेळी दहावी व बारावीची परीक्षा लेखी घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेची काळजी विद्यार्थ्यांना लागली असून दरवर्षीप्रमाणे लवकर वेळापत्रक खेळ केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोयीचे होणार आहे.(matriculation examination was held on OMR seat)

timetable of 10th and 12th examinations has not been announced yet
Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

असे मत शिक्षक व विद्यार्थ्यांमधून व्यक्त केले जात असले तरी शिक्षण खात्याने एप्रिल महिन्याच्या अखेरीस बारावी तर मे मे महिन्याच्या अखेर 10 ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र शिक्षण खात्याकडून वेळापत्रक जाहीर करण्या संदर्भात घाई केली जाणार नाही. असे दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळापत्रक जाहीर होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी शाळा लवकर सुरू झाल्या आहेत .तरी देखील अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी दहावीच्या अभ्यासक्रमात 20 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन करून वेळापत्रक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 10 जानेवारीपर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात. मात्र परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे यावर अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मे किंवा जून महिन्यात दहावीची परीक्षा होण्याची शक्यता आहे.

- रवी बजंत्री, गट शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.