सातारा : शहापुर (ता. कऱ्हाड) येथे एका घरा समोरील पटांगणात मोठा साप रहिवाशांना आढळला. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. या परिसरातील काही रहिवाशांनी सर्प मित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर शिरवडे (ता. कऱ्हाड) येथील सर्प मित्र शंभू व वैभव तांबे हे घटनास्थळी दाखल झाले. तांबे बंधूंना साप पाहताच ते मन्यार जातीचे असल्याचे आढळले. त्यांनी शिताफीने त्यास पकडून पिश्वीत (रेसक्यू बॅग) ठेवून दिले.
शिरवडे (ता. कऱ्हाड) येथील शंभु तांबे व वैभव तांबे हे दोघे गेली सहा वर्ष त्यांच्या गावात तसेच वेळ पडल्यास तालुक्यांत सर्प मित्र म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सर्प व वन्य जीवांना वाचविले आहे. आज (मंगळवार) सकाळी सात वाजता त्यांना शहापूर (ता. कऱ्हाड) येथून एक फोन आला. आमच्या परिसरातील एका घराजवळ एक मोठा साप आला आहे. तुम्ही येता का ? तांबे बंधूंनी तातडीने होकार दिला.
अवघ्या 20 मिनीटांत ते घटनास्थळी पोहचले. सर्प मित्रांना दररोज साप परिचयाचे झाले असतात. अगदी तसेच हा साप पाहिल्यानंतर झाले. त्यांनी हा साप दुर्मीळ व विषारी असल्याचे सांगितले. काही क्षणांत त्यांना सापास पकडून पिश्वती ठेवून दिले. त्यांचे मित्र योगेश शिंगण यांच्याशी संपर्क साधला. योगेशने हा साप वॉल्स सिंध क्रेट मन्यार जातीचे असल्याचे नमूद केले.
आता सर्पदंशावर आरोग्य केंद्रांतही उपचार उपलब्ध
तांबे बंधू म्हणाले गेली काही वर्ष आम्ही वेगवेगळे साप पकडले परंतु आजचा दिवस काही औरच होता. आमच्यासाठी तो विशेष म्हणावा लागले. याचे प्रमुख कारण म्हणजे सह्याद्री अथवा कोकणपट्टा या ठिकाणी दुर्मीळ वन्य जीव आढळतात. त्यातीलच एक वॉल्स सिंध क्रेट मन्यार होय. हा साप मध्यमरात्री बाहेर पडतो. तो अन्य सापांना देखील त्रास देऊ शकतो. सुमारे साडे चार फूट असलेले हे मन्यार पकडल्यानंतर ते आम्ही शहापूर - शिरवडे या रस्त्यावरील र्निमनुष्य स्थळी सोडून दिले.
तुम्हांला आपल्या परिसरात साप आढळल्यास त्यास मारु नका. तुम्ही तातडीने तुमच्या माहितीतील सर्प मित्रांना कळवा. ते तुमच्यापर्यंत पोहचतील आणि तुम्हांला व सापाला दोघांना ही सुरक्षित ठेवतील अशी भावना तांबे बंधू व योगेश शिंगण यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.