मांगले : ज्या शाळेकडे बघून सरकारी शाळांची व्याख्याच बदलावी, अशी वाटावी अशी मुलांची आणि मुलींची सुवर्ण महोत्सवी शाळा बनली आहे. जिल्हा परिषद शाळा नं. 1 आणि 2 शाळांच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांसह भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीला विविध विषयांची माहिती देणा-या ठरत आहेत.
भौगोलिक माहिती, इतिहास, विज्ञान, गणित, महापुरुषांचे विचार, तत्त्वज्ञान, संरक्षणविषयक माहिती निसर्गविषयक माहिती, प्राणीविषयक माहिती, म्हणी, बाराखडी भिंतीवरच वाचता येतात. शाळेच्या निर्मितीला 150 वर्षे झाली आहेत. शाळेने अनेक आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. तालुक्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा म्हणून शाळेचा लौकीक आहे.
दोन्ही शाळातील शिक्षकांच्या समन्वयामुळे दोन लाख पन्नास हजार लोकवर्गणी जमा झाली. शाळेची अंतर्गत रंगरंगोटी व व्हरांड्याच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी केलेल्या अवाहनामुळे लोकवर्गणी जमा झाली. त्यामुळे शाळा सुंदर करता आली.
शाळेच्या बोलक्या भिंतींवर आकाशगंगा, मुल्ये, शाळेची वैशिष्ट्ये सांगणारे फलक, विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक, पक्षी, प्राणी, अभयारण्ये, धरणे, महासागरांसह विविध प्रकारची माहिती विध्यार्थ्यांसह शाळेत येणा-या प्रत्येकाला भुरळ पडणारी आहे. दोन्ही शाळांत सध्या तब्बल पाचशे विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शाळेला काही ग्रामस्थांनी मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ दोन स्मार्ट टी.व्ही. सेट भेट मिळाले. इतर वर्गातही स्मार्ट टीव्ही बसवले जाणार आहेत. शिष्यवृती परीक्षेत अनेक विद्यार्थी चमकलेत. शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम राबवला जातो.
प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांची नखे, कपडे, दात यांची तपासणी केली जाते. सुसज्ज स्वच्छतागृहे बांधण्यात आलीत. डिजिटल वर्ग खोली सुरू केली आहे. मुलांना आवडणाऱ्या गोष्टी, बडबड गीतांचे
ऑडिओ-व्हिडिओ, रंजक शैक्षणिक खेळ या डिजिटल मुलांना खेळण्याची मुभा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम शिक्षण समितीचे सदस्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांसह मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.
दोन्ही शाळेतील शिक्षकांचा समन्वय, शाळेतील सर्व शिक्षकांनी दिलेला वेळ, माजी विद्यार्थ्यांची शाळेविषयी असणारी आस्था, ग्रामपंचातीचे सहकार्य, ग्रामस्थांचा सहभाग यामुळे शाळेच्या भिंती
बोलक्या करू शकलो. अडीच लाखांची देणगी जमा झाल्यामुळे शाळेचे रुपडे पालटले आहे.
- विश्वास वरेकर, शाळा नं. 2
ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा आहे. चित्रकार राजू जाधव, डी. के. कदम यांनी वेळेत केलेली मदत यामुळे शाळा सर्वांगसुंदर झाली आहे.
- दगडू पाटील, शाळा नं. 1
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.