वारणा उद्‍भव योजना गुंडाळली? प्रशासनाकडून ठोस कार्यवाही नाहीच; माहिती अधिकारातील उत्तरातून वास्तव आलं समोर

दीड दशकापूर्वी वारणा उद्‍भव योजनेचा प्रस्ताव मांडला होता.
Warna Udbhav Scheme Sangli Municipal Corporation
Warna Udbhav Scheme Sangli Municipal Corporation esakal
Updated on
Summary

प्रतिवर्षी वारणा नदीतही प्रदूषित पाण्यामुळे मासे मरत आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्षही तितकेच गंभीर आहेत.

सांगली : महापालिकेच्या (Sangli Municipality) बहुचर्चित वारणा उद्‍भव योजनेला (Warana Udbhav Yojana) ‘ब्रेक’ लागला आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी माहिती अधिकारात प्रशासनाकडे माहिती विचारली असता अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे उत्तर मिळाले.

Warna Udbhav Scheme Sangli Municipal Corporation
Sugarcane FRP : उसाच्या 'एफआरपी'त प्रतिटन 250 ने वाढ; मोदी सरकारचा मोठा निर्णय, पुढील वर्षी मिळणार 'इतका' दर

सध्याच्या कृष्णा प्रदूषण योजनेचा (Krishna Pollution Scheme) प्रकल्प आराखडाच झालेला नाही. कृष्णेइतकीच वारणा नदीची प्रदूषणाची स्थिती असताना राजकीय दबावाखाली ही योजना पुढे रेटली जात होती. नागरिक जागृती मंच, महापूर नियंत्रण कृती समितीसह तज्ज्ञांनी या योजनेला विरोध करताच चांदोली धरणातून थेट नैसर्गिक उताराने पाणी घेता येईल, अशी योजना पुढे मांडली.

दीड दशकापूर्वी वारणा उद्‍भव योजनेचा प्रस्ताव मांडला होता. कृष्णा नदीतील पाणी प्रदूषित असून त्याऐवजी वारणा नदीवरील समडोळी, दानोळी बंधाऱ्यातून महापालिकेला पाणी दिले जावे, असा मूळ प्रस्ताव होता. तथापि आता वारणा नदीची अवस्थाही कृष्णेसारखीच आहे. प्रतिवर्षी वारणा नदीतही प्रदूषित पाण्यामुळे मासे मरत आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्षही तितकेच गंभीर आहेत.

Warna Udbhav Scheme Sangli Municipal Corporation
Sulkud Water Scheme : सुळकूडच्या पाण्याचा वाद चिघळणार? उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावली, नागरिकांत प्रचंड रोष

थेट चांदोली धरणातून पाणी घेतले जावे, यासाठी नागरिक जागृती मंचतर्फे विविध तज्ज्ञांच्या सहभागाने परिसंवाद घेण्यात आला होता. हजार कोटींच्या निधीतून महापालिका क्षेत्रासह शिराळा, इस्लामपूर, आष्टा शहरांनाही थेट धरणातून स्वच्छ पाणी देता येणे शक्य आहे, असा निष्कर्ष पुढे आला. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी शासनाकडे तो प्रस्ताव पाठवण्याचाही निर्णय घेतला होता. आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही योजनांचे प्रस्ताव पाठवले जातील, अशी भूमिका घेतली होती.

Warna Udbhav Scheme Sangli Municipal Corporation
बेळगाव सीमाप्रश्‍नाचा तिढा सुटणार? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात मांडणार भक्कमपणे बाजू; मुंबईतील बैठकीत निर्णय

‘म्हैसाळ’ बॅरेज कारण

म्हैसाळ बॅरेजेस पूर्ण झाल्यानंतर कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी इतकी वाढलेली असेल की सांगली आणि दानोळी असे दोन्ही बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे वारणा उद्‍भव योजना कालबाह्य झाली आहे. त्यामुळेच प्रशासनाने याबाबत ठोस अशी अद्याप कृती केलेली नाही. माहिती अधिकारातील उत्तरातून हेच वास्तव पुढे आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()