Water Issue : सांगलीकरांची पाण्यासाठी वणवण कायम; टँकरने पाणी

सांगलीकरांची पाण्याविना वणवण! गेल्या तीन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून रांगाच्या रांगा लागत आहे.
Water Supply
Water Supply esakal
Updated on

सांगली - हिराबाग येथील ८०० डीआय जॉईंटला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्मी सांगली पाण्याविना वणवण करीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून रांगाच्या रांगा लागत आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरीक आता संतप्त झाले आहे. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या तोंडावर सांगलीकरांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

हिराबाग येथील पाणीपुरवठा केंद्रातील वाहिनीला तीन दिवसांपूर्वी मोठी गळती लागली आहे. त्यासाठी लागणारे काही साहित्य पुण्यावरून मागवण्यात आले आहे. त्या आज सायंकाळी दाखल झाल्या. रात्री उशीरा पुन्हा कामाला सुरूवात करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत युद्धपातळीवर काम सुरू राहणार आहे. त्यामुळे उद्याच याची चाचणी घेतली जाणार आहे, असे पालिका प्रशासन सांगते. पण, प्रत्यक्षात पाणी येईल, ते खरे, अशीच गत या पाणीपुरवठा विभागाची झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून गावभाग, हरिपूर, हनुमाननगर, कोल्हापूर रोड, भारतनगर, गणेशनगर, सिव्हिल हॉस्पिटल, खणभाग, पेठभाग, उत्तर शिवाजीनगर, वखारभाग, कर्नाळ रोड आदी परिसरामध्ये पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सोसावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रत्येक भागातील माजी नगरसेवकांनी स्वखर्चाने नागरीकांसाठी टँकर उपलब्ध करून दिले आहे.

तर सदनिकेत पाणी भरणेच कठीण झाले आहे. त्यामुळे पाच हजार रूपये मोजून पाण्याचे खासगी टँकर मागवले जात आहे. तर काही भागात वॉटर एटीएमवर रांगा दिसून येत आहे. एका बाजूला नदी दुथडी भरून वाहते, तर दुसऱ्या बुजाला सांगलीकरांच्या घशाला कोरड दिसून येत आहे. पालिका प्रशासनाकडूनही टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, हजारो लोकांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा होणार कसा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. उद्या (मंगळवार) पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही साहित्य पुण्यावरून मागवण्यात आले आहे. ते सायंकाळी दाखल झाले आहे. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत काम सुरू राहणार आहे. उद्या, मंगळवार असल्याने ‘महावितरण’कडून विद्युत पुरवठा खंडित होतो. मात्र, त्यांनाही याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. दोन दिवसांवर सण असल्याने कोणत्याही परिस्थितीत उद्या पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

- चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.