Water Supply: ‘जलजीवन मिशन’ची कामे निम्मीच पूर्ण..

Half of the work on tap water supply schemes is not yet to be completed: स्थानिक राजकारणाचा फटका; उद्दिष्टपूर्ती गेली 2025च्या मार्चपर्यंत पुढे
water supply in sangali
water supply in sangalisakal
Updated on

Sangali: जिल्ह्यांत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळ पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप निम्मी पूर्ण झाली आहेत. मार्च 24अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्‍ट आता पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत ढकलले आहे. त्यातच अनेक गावांत सत्तांतर झाल्याने स्थानिक राजकारणाचा फटका बसत आहे.

पंतप्रधान मोदींचे स्वप्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 15ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ‘हर घर जल’ ही योजना जाहीर केली. सन 2024 च्या मार्चपर्यंत देशातील प्रत्‍येक गावांत, प्रत्येक घरांत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, या योजनेची मुदत संपली तरी जिल्ह्यात अर्धी योजनाच पूर्ण झाली आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 683 योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी 792 कोटी 21 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेत आतापर्यंत 320 कामे पूर्ण झाली असून, 363 कामे प्रगतिपथावर आहेत. म्हणजेच ती अपूर्ण आहेत आणि ही कामे पूर्ण करण्याची मुदत आता मार्च 2025 अशी आहे.

sakal

निवडणूक संपली, मुदत वाढली

यंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गतवर्षी दिले होते. मात्र, या मुदतीपर्यंत केवळ 33 टक्केच कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली आणि केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांचे सरकार आले. पाठोपाठ कामे पूर्ण करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.

792 कोटींपैकी निम्मेच खर्च

जिल्ह्यात दहा तालुक्यांतील 683 गावांत ही योजना राबवण्यात येत आहे. ७९२.२१ कोटींचा खर्च होणार आहे. मात्र, या निधीतील 388 कोटी 72 लाखांचा निधी खर्च झाला आहे. त्यातून 323 कामेच पूर्णत्वास गेली आहेत. तर 360 कामे अद्याप अपूर्ण आहेत.

तीन महिन्यांत 120 कामे पूर्ण

गतवर्षी पालकमंत्री खाडे यांनी मार्चअखेर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी 203 कामे पूर्ण झाली होती. मात्र, त्यांच्या इशाऱ्यानंतरही गेल्या आठ महिन्यांत 120 कामे पूर्ण झाली आहेत. सध्या 47 टक्केच कामे पूर्ण झाली असून, अजून 53 टक्के कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मार्च 25 अखेरची डेडलाईन आहे.

स्थानिक राजकारणाचा फटका

जलजीवन मिशनच्या कामांना गावातील स्थानिक राजकारणाचा फटका बसत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि अनेक गावांत सत्तांतर झाले. त्याचा फटका या योजनेला बसत आहे. योजनेची टाकीची जागा बदल, पाईपलाईनची जागा बदल असे अडथळे या राजकारणामुळे येत आहेत.

ग्रामपंचायतींकडे १४८ योजना सुपूर्द

जिल्ह्यात होत असलेल्या जलजीवन मिशनच्या 683 योजनांत 611 योजना नळ पाणीपुरवठ्याच्या तर 72 योजना विंधन विहिरींच्या आहेत. यातील पूर्ण झालेल्या 323 योजनांमध्ये 262 नळ पाणीपुरवठ्याच्या, तर 61 विंधन विहिरींच्या आहेत. यापैकी 148 योजना ग्रामपंचायतींकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

साडेचार लाख कुटुंबांना नळ जोडणी

जिल्ह्यांतील चार लाख 59 हजार 48 कुटुंबांना घरगुती नळ जोडणीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी तीन लाख 99 हजार 432 कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित 59 हजार 616 घरगुती नळ जोडणीमध्ये 31 हजार 616 नळ जोडणी जिल्हा परिषदेकडील नळ पाणीपुरवठा योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहेत. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर 28 हजार नळ जोडणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केली जाणार आहेत.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची 683 कामे केली जाणार आहेत. ही सर्व कामे मार्च 25 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काही गावांत या कामावरून समस्या आहेत. मात्र त्यातून तोडगा काढत ही कामे पूर्ण करण्यात येत आहेत.

- संजय येवले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

water supply in sangali
Jal Jeevan Scheme : जलजीवनच्या 702 योजनांमधून केवळ पाणीपुरवठा सुरू! जूनअखेर 763 योजना पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com