मराठा सैनिकांचे शौर्य आणि पराक्रम इंग्रजांनादेखील ठाऊक झाले होते. त्यामुळेच इंग्रजांनी १७६८ मध्ये मराठा युवकांना लष्करात भरती करून घेत ‘बॉम्बे सिपोय’ची स्थापना केली.
बेळगाव : मूठभर सैन्याच्या माध्यमातून अफाट सैन्याला नामोहरम करण्याची कला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सैन्याला अवगत करून दिली. मावळ्यांचा ‘गनिमी कावा’ आजही जगप्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत ही युद्धकला अवगत करता येते, हे जाणल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी युद्ध प्रशिक्षणासाठी बेळगावची (Belgaum) निवड केली, तर स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारनेही बेळगावला अधिकच प्राधान्य दिले. त्यामुळेच आज भारतीय लष्करातील (Indian Army) सर्वात जुन्या ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा प्रशिक्षण तळ बेळगावात आहे.