प्रा. तानाजी सावंत यांचे काय चुकले?

-
-
Updated on

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला सांगोला विधानसभा मतदासंघातील शहाजी पाटील यांच्या अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचा निर्णय चुकल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यांच्यामुळेच शिवसेनेला पराभवाला सामोर जावे लागल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आता उघड बोलू लागले आहेत. त्यातच जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची हकालपट्टी केल्याने त्यांना दुसरा धक्का मानला जात आहे. यापूर्वी त्यांना मंत्रीमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले नव्हते.

हेही वाचा- सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी
उमेदवारी चुकीची?

२०१४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदासंघातून माजी आमदार नारायण पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यांनी केलेले विकास काम आणि पक्ष वाढवण्यासाठी केलेले काम पाहुन त्यांना २०१९ ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. दरम्यान प्रा. सावंत यांनी मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या जवळीकबद्दलचे कारण करत माजी आमदार पाटील यांची उघड कानउघडणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रा. सावंत यांनी प्रयत्न केला. मात्र त्यात बागल यांचा पराभव झाला. या निवडणुकीत माजी आमदार पाटील यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवली त्यात दोन क्रमांकाची मते. त्यांनी पडली आहेत. केवळ प्रा. सावंत यांच्या चुकीच्या निर्णयाचा हा फटका बसल्याचे येथे मानले जाऊ लागले. याबरोबर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ही महेश कोठे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसमधून माजी आमदार दिलीप माने यांना प्रवेश दिला. आणि त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. त्यानंतर प्रा. सावंत यांनीच पाटील व माने यांची उमेदवारी कट केल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, शेवटपर्यंत पाटील आणि कोठे यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. बागल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी पाटील यांना सावंत यांनी बोलवले होते. तेव्हा कोठेही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत होते. या दोन्ही उमेदवारी चुकीच्या दिल्याचे कार्यकर्ते सांगत होते. याचा रोष प्रा. सावंत यांच्यावर सोशल मीडियातूनही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. मोहोळ व बार्शी या मतदासंघातही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते. त्यांचाही यात पराभव झाला आहे.

हेही वाचा- शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जोरात... पोस्टरवर झळकले ठाकरे, पवार, थोरात
लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांची हकालपट्टी

सोलापूर जिल्हा जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी पक्षविरोधी कारवया केल्याचे कारण करत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेनेमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. आता शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

बरडे प्रभारी जिल्हा प्रमुख
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अदेशाने सोलापूर जिल्ह्यासाठी प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून पुरोषत्तम बरडे यांची निवड केली आहे. विधानसभा निवडणूक झाल्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेत नवनवीन घडामोडी घडत आहेत. आमदार प्रा. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने आधीच त्यांच्यातील काही कार्यकर्ते नाराज होते. याबाबत सामुहिक राजीनामे देण्याच्याही तयारीत काही कार्यकर्ते होते. यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकील काही प्रमुख कार्यकर्ते गैरहजर होते. त्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राजीनामा देण्यासाठी नाही तर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. 

दिलीप माने यांची हालचाल
दिलीप माने यांच्यावर संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेतील पदाधीकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत शनिवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक होणार असदल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.