Loksabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांना आव्हान कोणाचं? नारायण राणे, किरण सामंत यांच्या नावाची चर्चा

Loksabha Election: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionEsakal
Updated on

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र राणे यांनाच उमेदवारी मिळणार, अशी अटकळ बांधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे.

या मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधाऱ्यांवर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप केला जात आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राऊत हे विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करीत असल्याची टीका सत्ताधारी करीत आहेत.

Loksabha Election
शरद पवार गटात प्रवेश करताच धैर्यशील मोहितेंचा राम सातपुतेंना इशारा

विविध घटकांच्या भावना

नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना राऊत यांच्याशी असेल. त्यामुळे या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होईल, असे सध्याचे चित्र आहे. हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. आरक्षणावरून मराठा समाजात नाराजी आहे. मराठा समाजाचे काही नेते वगळता ही नाराजी कोणी थेट बोलून दाखवीत नसले तरी हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेरोजगारी आणि महागाईमुळे जनमानसांत प्रक्षोभ आहे.

Loksabha Election
Madha Lok Sabha: माढा आणि बारामतीसाठी ‘डिनर डिप्लोमसी’! शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटलांची एकत्रित रणनीती

जिल्ह्यात यात शाश्वत विकासाची उणीव आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदार हापूसला हमीभाव मिळावा म्हणून आग्रही आहेत तर काजूला २०० रूपये हमीभाव मिळावा म्हणून काजू बागायतदार आग्रही आहेत. या बागायतदारांच्या समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांनी अपेक्षित पाठिंबा दिलेला नाही. मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणावरून या सर्व घटकांमध्ये नाराजी आहेच.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर डॉ.राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.

Loksabha Election
एक रुपया..मिठाची पुडी देऊन 1954 मध्ये बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न; अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

सभा, बैठकांवर भर

राऊत यांची प्रचाराची पहिली फेरी अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी आतापर्यंत खळा बैठकांवर भर दिला. नारायण राणे हेच उमेदवार गृहीत धरून ते टीका करीत आहेत. गावागावांत जाऊन त्यांनी लोकांसमोर त्यांची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे राणे यांचे नाव अजूनही निश्चित झाले नसली तरी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे तालुकानिहाय महत्त्वाच्या कार्यकर्त्याच्या सभा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. राणे यांनी आतापर्यंत पाच ते सहा तालुक्यांमध्ये सभा घेतल्या आहेत.

शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही जिल्ह्याच्या काही भागांत कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याला मतदान करा, असे दोघांकडून केले जात आहेत.

Loksabha Election
Jalgaon Lok Sabha Election : भाजप पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; भाजपचा एक गट प्रचारापासून अलिप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.