आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही. वारणा उद्भव योजना असो अथवा थेट चांदोली धरणातून पाणी आणणे असो, दोन्हींची तुलना झालीच पाहिजे.
सांगली : आमचा वारणा उद्भव योजनेला (Varna Udbhav Yojana) विरोध नाही; मात्र चांदोली धरणातून (Chandoli Dam) थेट पाणी आणणे अधिक फायद्याचे ठरेल, असे आमचे मत आहे. या दोन्ही योजनांचा अभ्यास होऊ द्या. त्यातून जे योग्य होईल, त्यावर निर्णय होईल. मदनभाऊ आज हयात असते, तर त्यांनीही धरणातून पाणी आणण्याची भूमिका घेतली असती, अशी भूमिका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मांडली.
मंचतर्फे आज (ता. २) दुपारी चार वाजता गणेशनगरातील रोटरी सभागृहात चर्चासत्र होणार आहे. जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, जीवन प्राधिकरणाचे एस. के. रांजणे, वास्तुविशाद प्रमोद चौगुले मार्गदर्शक आहेत.
ते म्हणाले, सगळ्याच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. मदनभाऊंएवढी दूरदृष्टी असलेले कार्यकर्ते राहिलेले नाहीत. आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही. वारणा उद्भव योजना असो अथवा थेट चांदोली धरणातून पाणी आणणे असो, दोन्हींची तुलना झालीच पाहिजे. नदीकाठावरील व ओढे-नाले बाजूला असणाऱ्या शेतीतून होणारा रासायनिक अधिक खतांचा वापर आणि प्रत्येक गावातून मिसळणारे सांडपाणी याची समस्या नदी परिसरात सर्वत्र सारखीच आहे.
कृष्णा नदी प्रदूषित आहे आणि वारणा नाही, हा जावईशोध कोणाचा? आजच्या घडीला वारणा उद्भव योजनाही प्राथमिक अवस्थेत आहे. शासनस्तरावर प्रस्तावही सादर नाही. दोन्ही योजनांचा अभ्यास करा. फायदे-तोटे अभ्यासा. दोन्ही प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर करूया. ज्याला शासन मंजूर देईल, त्याचा स्वीकार करू, असे साखळकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘नेत्यांची नावे घेऊन भावनिक करू नका. चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेबाबत उद्या रोटरी सभागृहात सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील व मदनभाऊ पाटील युवा मंचलाही निमंत्रित केले आहे. अभ्यासाने पुढे जाऊ. योजना पुढच्या पन्नास वर्षांसाठी असेल. हा विषय आरोप-प्रत्यारोपाचा नाही, १० लाख नागरिकांच्या आरोग्याचा आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.