Tipu Sultan Jayanti : महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या जयंतीला ताकदीने विरोध करू; 'हिंदू एकता आंदोलन'चा महत्त्वपूर्ण निर्णय

टिपू सुलतान जयंती (Tipu Sultan Jayanti) साजरी करण्यावर राज्य शासनाने बंदी घालावी.
Tipu Sultan Jayanti
Tipu Sultan Jayantiesakal
Updated on
Summary

टिपू सुलतानच्या जयंतीला परवानगी देऊ नये.

सांगली : टिपू सुलतान जयंती (Tipu Sultan Jayanti) साजरी करण्यावर राज्य शासनाने बंदी घालावी, अशी मागणी करून जयंतीला हिंदू एकता आंदोलन (Hindu Ekta Andolan) ताकदीने विरोध करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हिंदू एकता आंदोलनच्या सांगली शहर पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली.

Tipu Sultan Jayanti
आता अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; आरोग्य विभाग महत्त्वाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत!

या बैठकीत सांगली महानगरपालिका (Sangli Municipal Corporation) क्षेत्रात हिंदू एकता आंदोलन या संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे व संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाखा उघडणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीस एकता आंदोलनाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक हिंदू केले.

Tipu Sultan Jayanti
मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच सिद्धरामय्यांची मंत्री-आमदारांना सक्त सूचना; म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद..

प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘टिपू सुलतान जयंतीवर राज्यातल्या सरकारने बंदी घालावी, तसेच टिपू सुलतानचे पोस्टर छापण्यावर बंदी घालावी. राज्यात होणारे उदात्तीकरण तत्काळ थांबले पाहिजे. टिपू सुलतानच्या जयंतीला परवानगी देऊ नये.’’

या वेळी प्रसाद रिसवडे, श्रीकांत शिंदे, ॲड. होमकर, राजू जाधव, शिवाजी पाटील, गोपाळराव माने, रामभाऊ सूर्यवंशी, अजय वाले, रवी वादवणे, अवधूत जाधव, अमित सूर्यवंशी आदींनी हिंदू एकता आंदोलनाची भक्कम बांधणी करण्याबरोबरच उपक्रम राबविण्यासंदर्भात सूचना केल्या.

Tipu Sultan Jayanti
Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी सचिन देसाई, राकेश कलकुटगी, संभाजी पाटील, अशोक पाटील, श्रीधर मिस्त्री, आशिष साळुंखे, सुनील जाधव, अनिरुद्ध कंभार, ओंकार देशपांडे, नारायण हांडे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.