Grampanchyat Election : तीन हजार लिंबू चिरडून विजयी उमेदवार गावात; अंधश्रद्धेला खतपाणी

चुडेखिंडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Lemon Crush
Lemon CrushSakal
Updated on

ढालगाव - चुडेखिंडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

चुडेखिंडी हे कवठेमहांकाळ व जत तालुक्याच्या सीमेवर आहे. सात सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर कोणीतरी मतदान केंद्रातील बूथच्या बाहेर लिंबू आणि भानामतीचे साहित्य पुरले असल्याचे निदर्शनास आले होते. याची चर्चा परिसरातील गावात सर्वत्र सोशल मीडियावर ऐकायला मिळत होती. वीस तारखेला मतमोजणीनंतर सत्ताधारी पक्ष पराभूत झाला. त्यानंतर विजयी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश करताना तीन हजार लिंबू चिरडून गावात प्रवेश केला. याचीही चर्चा परिसरातील गावांत रंगली आहे.

चुडेखिंडी हे दुष्काळी गाव जलसंधारणाच्या कामातून समृद्ध झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी चुडेखिंडी गावात केली होती. गावात काही वर्षांत बरीच विकासकामे झाली आहेत. मात्र अंधश्रद्धेच्या या प्रकाराने काही लोकांचे मागासलेपण दिसून येत आहे. यापुढे तरी हे प्रकार थांबणार का, असा प्रश्न आहे.

निवडणूक जिंकावी म्हणून आमच्या विरोधी गटाने बूथच्या बाहेर लिंबू व भानामतीचे साहित्य पुरले होते. निवडणुकीनंतर आम्ही तीन हजार लिंबू चिरडून या अंधश्रद्धेला मूठमाती दिली.

- बापूसाहेब पाटील, विद्यमान सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.