किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) - कृष्णेचे पाणी घाटमाथ्यावर उपसा सिंचनासाठी गेल्यामुळे जिराईत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. त्याचा परीणाम खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या कडधान्यांच्या उत्पन्नावर झाला. तसा खाद्य तेलाच्या उपन्नासाठी घेतल्या जाणाऱ्या सुर्य फुलाच्या पीकावरही झाला आहे.
सिंचन क्षेत्र वाढण्यापुर्वी सुर्य फुलाचे उत्पन्न माढ्या पद्धतीने अगर भुईमुग, ज्वारी, बाजरी, तंबाखू पीकात मोगणा पद्धतीने घेतले जायचे. शेती कमी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात आडतासाला हमखास सुर्यफुलाचे ताटवे उठून दिसायचे. हल्ली मात्र हे चित्र पुसटसे झाले असून सध्यस्थितीत वाळवा तालुक्यात सुर्यफुलाचे होणे दुर्मिळ झाले आहे.