Vishal Patil : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची बांधणी होणार का?

Congress: लोकसभेला विशाल पाटील यांच्या विजयाने काँग्रेसला ‘अच्छे दिन’, कार्यकर्त्यांमध्‍ये उत्‍साह
good day vishal patil
good day vishal patilsakal
Updated on

कामेरी : लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाल्याने काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आलेत. जिल्ह्यात विश्वजित कदम यांनी आपली पकड चांगली दाखवली. याचा लाभ आता वाळवा तालुक्यातील काँग्रेसला उभारी देणारी ठरणार का? जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची बांधणी मजबूत होणार का, हे आगामी काळच ठरवणार आहे.

वाळवा हा जसा क्रांतिकारकांचा तालुका, तसा तो राजकारणातही अग्रेसर आहे. याआधी काँग्रेसचे तालुक्यावर मोठ्या प्रमाणात वर्चस्व होते. दिवंगत वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खांद्याला खांदा लावून काम करणारे माजी खासदार दिवंगत एस. डी. पाटील, कामेरीचे छगनबापू पाटील, इस्लामपूरचे एम. डी. पवार, रेठरे हरणाक्षचे बाळासाहेब मोरे, कोरेगावचे आर. के. पाटील, शिगावचे स्वरूप पाटील, आमदार पी. डी. मधाळे होते.

यातील छगनबापू पाटील हे वाळवा पंचायत समितीचे वीस वर्षांहून अधिक काळ सभापती राहिले, तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रेठरे धरणचे आर. एस. पाटील जिल्हा परिषद सदस्य म्हणून बरीच वर्षे कार्यरत होते.

याशिवाय, ॲड. बी. एस. पाटील, नानासाहेब महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नव्या पिढीतील येडेनिपाणीचे आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, इस्लामपूरचे नगरसेवक वैभव पवार यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती.

मात्र यातील काहींनी जुन्या-नव्या पिढीतील अनेकांनी सोयीस्कर राजकारण करून वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश करून राजकारण सुरू केले. छगनबापू यांचे सुपुत्र सी. बी. पाटील यांनी व नानासाहेब महाडिक यांचे सुपुत्र सम्राट व राहुल महाडिक यांनी भाजपचा हात धरला. याशिवाय, चिकुर्डेचे शिवाजीराव पाटील यांचे सुपुत्र अभिजित पाटील यांनी शिवसेनेत जाणे पसंत केले.

रेठरेधरणचे आर. एस. पाटील यांचे सुपुत्र दादासाहेब पाटील, येडेनिपाणीचे आनंदराव पाटील राष्ट्रवादीत गेले, तर काँग्रेस पक्षात राहूनच बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार, मनीषा रोटे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात

काँग्रेसचा गड अबाधित राखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र आता त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे बळ मिळाले तर पुन्हा काँग्रेसची गटबांधणी मजबूत होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोलली जात आहे. त्‍यामुळे आगामी विधानसभेच्‍या तोंडावर कार्यकर्ते ‘रिचार्ज’ झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.