'बिम्स'मध्ये महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू; रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बळी?

Bims hospital Belgaum : मंगळवारी मध्यरात्री ‘बिम्स’ रुग्णालयाच्या प्रसूती विभागामध्ये सिजेरियनद्वारे महिलेची प्रसूती झाली होती.
Bims hospital Belgaum
Bims hospital Belgaumesakal
Updated on

बेळगाव : येथील ‘बिम्स’ रुग्णालयातील (Bims Hospital) प्रसूती विभागामध्ये दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणामुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. मंगळवारी (ता. १९) बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी डॉक्टरांच्या (Doctor) निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.