नगर : शहरातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या "अहमदनगर प्रेस क्लब' या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यशवंतराव गडाख यांना "जीवनगौरव' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (उत्कृष्ट प्रशासनप्रमुख), जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर (उत्कृष्ट प्रशासन अधिकारी), कोहिनूर वस्त्रदालनाचे प्रदीप गांधी (आदर्श व्यावसायिक), नोबेल हॉस्पिटलचे डॉ. बापूसाहेब कांडेकर (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), ढवळपुरीचे (ता. पारनेर) सरपंच डॉ. राजेश भनगडे (आदर्श कृतिशील सरपंच) व जिल्हा परिषदेच्या खांडके (ता. नगर) येथील शाळेला "आदर्श शाळा' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा - "क्रीडा'च्या खेळामध्ये कारवाई रखडली
प्रेस क्लबच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ व त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी सांगितले. सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जोडीने पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध दैनिकांच्या प्रतिनिधींचा "बेस्ट रिपोर्टर' पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र झोंड व अरुण वाघमोडे यांनी दिली.
अवश्य वाचा - त्यांच्या जन्मदिनी पुस्तकांचा मेळा!
पत्रकार दिनाच्या निमित्ताने सहा जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात, वर्षभरात विविध पुरस्कारप्रात पत्रकार पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार असल्याचे प्रेस क्लबचे सचिव मुरलीधर कराळे, सहसचिव दीपक कांबळे यांनी सांगितले.
प्रेस क्लबचे सदस्य असलेल्या पत्रकारांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, त्याच कार्यक्रमात या पॉलिसींचे वाटप केले जाणार असल्याचे खजिनदार ज्ञानेश दुधाडे यांनी सांगितले. काही निवडक ज्येष्ठ पत्रकारांचाही विशेष गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिर्के यांनी सांगितले.
वाचा - अध्यक्षपदासाठी राजश्री घुले
"बेस्ट रिपोर्टर' पुरस्कार
दीपक रोकडे, अण्णासाहेब नवथर, समीर दाणी, दीपक कांबळे, मयूर मेहता, अशोक परुडे, बद्रिनारायण वडणे, रवी कदम, मोहनीराज लहाडे, मिलिंद देखणे, दिलीप वाघमारे, ललित गुंदेचा, भाऊसाहेब होळकर, सुनील चोभे, संदीप रोडे, अंबरीश धर्माधिकारी, सुभाष मुदळ, प्रशांत पाटोळे, निशांत दातीर, अशोक सोनवणे, अनिल शहा, सुशील थोरात, अमीर सय्यद.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.