'उदं ग आई उदं'चा सौंदत्तीत जयघोष; महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोव्यातील 4 लाख भाविकांची डोंगरावर हजेरी

महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी सौंदत्ती येथील डोंगरावर यल्लम्मा (रेणुका) देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Saundatti Yellamma
Saundatti Yellammaesakal
Updated on
Summary

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा डोंगरावरील यात्रेला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे.

बेळगाव : कर्नाटकातील विविध भागांसह कोल्हापूरसह महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी सौंदत्ती येथील डोंगरावर यल्लम्मा (रेणुका) देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण डोंगर परिसर गर्दीने फुलून गेला आहे. काल (ता. २५) यात्रेच्या मुख्य दिवशी महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा व बेळगाव जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा डोंगरावरील यात्रेला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र भाविकांनी चार-पाच दिवसांपासून डोंगरावर गर्दी केली आहे. तसेच परंपरेप्रमाणे पडल्या भरण्याचा कार्यक्रम करण्यासह इतर विधी केले जात आहेत.

Saundatti Yellamma
माजी खासदार राठोडांनी मांडलेला 'नऊ'चा फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला; नेमकं काय आहे फॉर्म्युल्यात?

सोमवारी डोंगरावर अभिषेक, होमहवन, विशेष पूजा व आरती झाल्यानंतर कंकण मंगळसूत्र विसर्जनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला. मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा व बेळगाव जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक भाविक डोंगरावर दाखल झाले येत आहेत. यात्रेनिमित्त डोंगरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने भाविकांना पाणी, निवास आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र एकाचवेळी गर्दी झाल्याने भाविकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे चित्र दिसून आले.

Saundatti Yellamma
Congress Government : कर्जमाफीसाठीच शेतकऱ्यांना राज्यात दुष्काळ हवा असतो; मंत्री पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. तसेच ठिकठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यात्रा काळात स्वच्छतेसाठी मंदिर प्रशासनाने व्यापक योजना हाती घेणे गरजेचे बनले आहे. अजून चार ते पाच दिवस डोंगरावर गर्दी कायम असणार आहे. याची दखल घेऊन येणाऱ्या काळात भाविकांसाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.

Saundatti Yellamma
Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तीन एक्स्प्रेस रेल्वे दहा दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

‘रांगेतच पिण्याचे पाणी द्या’

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागले. मात्र सायंकाळी मंदिरातील धार्मिक विधीसाठी काही तास मंदिर बंद केले जात आहे. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. तसेच रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.