Sangli News : पाकीस्तान सीमेवर भारतमातेचे रक्षण करणाऱ्या तरुणाची जन्ममातेच्या अंत्य दर्शनासाठी तडफड

सीमेवरच्या नैसर्गिक संकटांचा सामना करीत त्या तरुणाला आईचे अंत्यदर्शन मिळावे यासाठी सैन्य दलानेही प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्‍यांचे लक्ष त्याच्या येण्याकडे होते. चार दिवसांनी शनिवारी (ता. १६) त्याने मातेचे दर्शन घेऊन अंतिम संस्कार केले.
young man who protected Mother India on border of Pakistan yearns for last darshan of his mother
young man who protected Mother India on border of Pakistan yearns for last darshan of his mother Sakal
Updated on

इटकरे (जिल्हा सांगली) : पाकीस्तान सीमेवर भारतमातेचे रक्षण करणाऱ्या येथील एका तरुणाची आपल्या जन्ममातेच्या अंत्य दर्शनासाठी तडफड झाली. सीमेवरच्या नैसर्गिक संकटांचा सामना करीत त्या तरुणाला आईचे अंत्यदर्शन मिळावे यासाठी सैन्य दलानेही प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्‍यांचे लक्ष त्याच्या येण्याकडे होते. चार दिवसांनी शनिवारी (ता. १६) त्याने मातेचे दर्शन घेऊन अंतिम संस्कार केले.

इटकरे येथील सत्यजीत संजय पाटील - नांगरे या युवा सैनिकाच्या बाबतीत घडलेली ही घटना. वडील संजय व आई शारदा हे दोघे येथे वास्तव्यास आहेत. बहिण सासरी असते. सामान्य परिस्थितीत वाढलेल्या सत्यजीतने देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून मोठ्या जिद्दीने चार वर्षापुर्वी सैन्यात भरती झाला. हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात पाकीस्तान सीमेवर कुपवाडाच्या काही मैल पुढे अतिशय दुर्गम मच्छर सेक्टर भागात सत्यजीत कर्तव्य बजावतोय.

गेल्या वर्षापासून न भेटलेला मुलगा सत्यजीत आता लवकरच घरी येईल या आशेने आई - वडील गावी शेती, मजुरी करतात. बुधवारी (ता. १३) सकाळी घरी स्वयंपाक करत असतानाच शारदा (वय ४५) यांच्या छातीत दुखू लागले.

त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. मुलगा सत्यजीतशी संपर्क साधून त्याला घटनेची माहिती दिली. सत्यजीत ज्या ठिकाणी सेवा बजावत आहे त्या ठिकाणी वातावरण अतिशय खराब आहे. १७ हजार फुट उंचीवर उणे २० अंश तापमान आहे.

सलग बर्फवृष्टी सुरु आहे. सैन्यातील अधिकाऱ्यांनी सत्यजीतला तेथून आणण्यासाठी तीन दिवस हेलीकॉप्टर पाठवले. मात्र ते तेथे उतरू शकत नव्हते. एकुलत्या मुलास आईचे दर्शन घडावे अशी भावकी व पै - पाहुण्यांची इच्छा. मृतदेह ठेऊन सारे प्रतिक्षेत आहेत या निरोपाने सैन्य अधिकाऱ्यांनी सत्यजीतला गावी पाठवण्यासाठी तेथील प्रतिकूल वातावरणात खूप प्रयत्न केले. तीन दिवसाने तेथे हेलिकॉप्टर उतरले.

अनेकदा सिमेवर असणारी भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती समाज माध्यमातून पाहता येते. आपले जवान अतिशय कठीण परिस्थितीत तिथे काम करतात याची जाणिवही होते. मात्र काही तरुणांच्या बाबतीत जन्मदात्यांच्या अंत्यदर्शनासाठी देखील तडफडण्याची वेळ येते हाही एक भावनिक प्रसंग समाजाने अनुभवला.

सत्यजितच्या नोकरीमुळे गरिबीचे चटके कमी होत चाललेल्या आईला जागा घेऊन घर बांधायची हुरहुर लागली होती. त्या विवंचनेत होत्या. ते स्वप्न अपुरे राहिले. वर्षभर मुलाची वाट पहाणार्‍या आईस मृत्यूनंतरही तीच वेळ आली. चार दिवस सर्वांचे लक्ष सीमेवरील सत्यजितच्या वाटेकडे लागून राहिले. चार दिवस अनेक अडचणींना तोंड देत तो दाखल झाला. त्याने मातृत्वास आज अखेरची सलामी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.