किल्लेमच्छिंद्रगड - अति मद्य प्राशनाने वाळवा तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुण पिढी कमकुवत होवू लागली आहे. सुरवातीस मजा म्हणून घेतला जाणारा दारूचा घोट पुढे चटक बनतोय. याचे भान पिणारालाही राहत नसल्याने अनेकांचे लिव्हर खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात काहीना लिव्हर डॅमेज होवून तर कांहीना हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
दारुच्या आधिकृत विक्रीने शासकिय तिजोरीत महसुली भर पडत असल्याने शासन स्तरावरून कायदेशीररित्या दारुबंदीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तर गल्लीबोळात बेकायदेशीर होणारी दारू विक्री चिरीमिरी देवून होत असल्याने बेकायदेशीर गुत्यांना आळा घालण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्नही अनुत्तरित करणारा आहे.
ग्रामसभानी जरी दारूबंदी करण्याचा ठराव केला तरी पोलीस खात्याकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वाढती लोकसंख्या आणि त्यातून वाढत जाणारी बेरोजगारी हे व्यसनाधीनता वाढीस लागण्याचे प्रमुख कारण बनू लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.