थांबायचे नाय आता थांबायचे नाय ; शिवरायांच्या मावळ्यांचा निर्धार
बिजवडी (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील सर्व दुर्ग संस्थांना एकत्रितपणे संघटना स्थापन करण्यात आलेल्या दुर्ग समन्वय समितीची पहिली बैठक सातारा येथे नुकतीच झाल्याची माहिती दुर्ग समिती आयोजक हर्षवर्धन गोडसे यांनी दिली.
हेही वाचा - गडभ्रमंतीतून फिजिकल फिटनेसचा असा हा ट्रेंड...
या वेळी जिल्ह्यातील दुर्गप्रेमी संस्था व शिवप्रेमी उपस्थित होते. सभेमध्ये दुर्ग संवर्धनासाठी लोक जनजागृती व जास्तीत जास्त लोकसहभाग करून जिल्ह्यातील किल्ल्यांची स्थिती व स्थापत्य सर्व्हे करून डागडुजी करण्यासाठी व भविष्यातील पर्यटन विकासाची शिफारस राज्य सरकारला वेळोवेळी करण्याचा निर्णय या बैठकीत मांडण्यात आला.
या वेळी लोकजनजागृती-संवर्धनाकडून शिवकालीन साम्राज्याचे पुनर्निर्माणाकडे हा सर्व गडप्रेमींनी मूलमंत्र बाळगावा, असे गोडसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व दुर्ग संवर्धन संस्थांनी व समूहाने एकत्रित यावे, एकत्रितपणे आपले प्रश्न मांडावेत, भविष्यातील दुर्ग विकासाला वाटचाल मिळेल. जिल्ह्यातील लोकसहभाग वाढेल, असे आवाहन दुर्ग बैठक आयोजक बाळकृष्ण ढेंबरे यांनी केले.
या बैठकीत सर्व दुर्गप्रेमी, शिवप्रेमींनी कोणतीही आशा न बाळगता जिद्दीने या शिवकार्या हातभार लावावा, स्थानिक लोकसमूहातून गडकोट स्वच्छता अभियान, संवर्धन मोहिमा व यासाठी विविध शाळांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना त्याचा इतिहास व जागृती निर्माण करण्यासाठी प्रेरणा द्यावी. लोकवर्गणी जमा करून ऐतिहासिक वास्तू व वारसा वाचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असेही गोडसे म्हणाले.
नक्की वाचा - लालपरी वाचवण्यासाठी सरसावल्या निर्भया
सदाशिवगड प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. योगेश कुंभार यांनी सदाशिवगडचा यशस्वी विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी महिमानगड, वारुगड, सदाशिवगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, केंजळगड, चंदनवंदनगड, भूषणगड, कल्याणगड, संतोषगड, जयगड, सुंदरगड, दातेगड, प्रतापगड इत्यादी जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते.
या बैठकीस डॉ. योगेश कुंभार, समीर आडके, महेश पाटील, संग्राम पाटील, रमेश भांदुर्गे, कुणाल देशमुख, राजेंद्र शिंदे, बापूसाहेब वांगडे, गणेश ढेंबरे, विशाल पवार आदी उपस्थित होते.
जरुर वाचा - छत्र हरपलेल्या भावडांना श्रृतिका फंडने उभारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.