सांगलीकरहो उद्या अनुभवा Zero Shadow Day!सावली सोडणार साथ

उद्या शुन्य सावली दिवस; दुपारी साडेबाराला अनुभवा खगोलशस्त्रीय चमत्कार
सांगलीकरहो उद्या अनुभवा Zero Shadow Day!सावली सोडणार साथ
Updated on

सांगली : सांगलीकरहो (sangli people) उद्या तुमची सावलीही (shadow) साथ सोडणार आहे. अर्थात अवघ्या पाच सात मिनिटांसाठीच. उद्या दुपारी सूर्य (sun) बरोबर सांगली शहराच्या अक्षांशावर आकाशात तळपत असल्याने मध्यान्हीला तो जेव्हा माथ्यावर येईल तेव्हा दुपारी साडेबाराला सूर्यकिरण लंबरूप पडतील. परिणामी सांगली परिसरातील सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात गायब होतील.

याबाबत खगोल (astrain) अभ्यासक शंकर शेलार यांनी दिलेली माहिती अशी, उद्या सकाळी 6.03 ला सूर्योदय होऊन सायंकाळी 6.53 ला सूर्यास्त होईल. साडेबाराला मनोरे, उंच इमारती, स्मृतीस्तंभ, मंदिरांची गोपूरे, दीपमाळा, टॉवर, लाईटचे पोल इत्यादी जमिनीला लंबरुप असलेल्या मोठमोठ्या वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडल्याने नाहीशा होतील. विस्मयकारक वाटावा असा हा खगोलीय चमत्कार फक्त ५ ते ७ मिनिटेच असेल. पृथ्वी (earth)स्वतःभोवती फिरते आहे. तिचा भ्रमण अक्ष तिच्या भ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 23.5 अंशांनी कललेला असल्याने आपण सूर्याचे उत्तरायण -दक्षिणायण अनुभवतो. त्यानुसार सहा महिने सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धात(२३.५ अंश) कर्कवृत्तापर्यंत (tropicals) होतो तर सहा महिने दक्षिण गोलार्धात मकर वृत्तापर्यंत (२३.५ अंश) होताना दिसतो. या विषुववृत्ताच्या दक्षिणोत्तर पट्यास 'उष्ण कटिबंध ' म्हणतात.

सांगलीकरहो उद्या अनुभवा Zero Shadow Day!सावली सोडणार साथ
कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात होणारा ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने सुरू करावा: गृहराज्यमंत्र्यांची मागणी

उष्ण कटिबंधातील प्रत्येक भूभाग वर्षातून किमान दोनवेळा सूर्याच्या समोर येतो, तेव्हा तेथे सूर्यकिरण लंबरूप (काटकोनात) पडतात. परिणामी त्या परिसरात माध्यान्ह वेळी (mid day time) ला सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडतात. त्यामुळे काही काळ तेथील वस्तू (shadow less /zero shadow) सावली हरवून बसतात. या मजेशीर खगोलीय घटनेस 'शुन्य सावली आविष्कार' म्हणतात. उष्णकटीबंधाच्या बाहेरील कोणत्याही भागात असे घडंत नाही. महाराष्ट्रात ३ मे ला दोडामार्ग, सावंतवाडी येथून सुरुवात होऊन ३१ मे ला धुळे जिल्ह्यात हा आविष्कार अनुभवता येईल. आपल्या शहरांच्या अक्षांशा प्रमाणे शुन्य सावली दिवस बदलतो. त्याचे वेळापत्रक गूगलवर सहज मिळते.

असा करा प्रयोग

गायब झालेली सावली आपण छोट्याशा प्रयोगाच्या सहाय्याने मनोरंजक पद्धतीने आपण पाहू शकतो. मैदानावर मध्यभागी उन्हामध्ये एक सरळ खांब काटकोनात उभा रोवा. तुमच्या शहराच्या शुन्य सावली दिवशी सूर्य माथ्यावर येईल तेंव्हा या खांबाची सावली गायब झालेली असेल.

सांगलीकरहो उद्या अनुभवा Zero Shadow Day!सावली सोडणार साथ
एका चुकीमुळे बंगालमध्ये डावे शिखरावरुन शून्यावर आले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.