वाकड : आयटी पार्क हिंजवडी (Hinjewadi IT Park)वाहतूक विभागाचे विभाजनातून दीड महिन्यांपूर्वी उदयास आलेल्या वाकड वाहतूक पोलिस विभागाने (Traffic Police)चालकांना शिस्त लावण्यासाठी जणू कंबरच कसली आहे. महिन्याभरात हद्दीत अनेक बदल करून व नियमावलीच्या कडक अंमलबजावणीद्वारे वाहतूक प्रश्न सोडविण्यात या विभागाने समाधानकारक यश मिळविले आहे.
शुक्रवारी (ता. ७) एका दिवसात ब्लॅक फिल्मीग आणि लहान अक्षरात वाहन क्रमांक टाकणाऱ्या १४४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल १ लाख ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत मर्यादेपेक्षा जादा ब्लॅक फिल्मीग लावून तसेच सीसीटिव्हीत वाहन क्रमांक दिसू नयेया उद्देशाने लहान आकारात नंबर प्लॅट टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त आनंद मोहिते व सहायक आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जमदाडे व उपनिरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर ही कारवाई केली.(Wakad news)
तत्पूर्वी वाकड वाहतूक विभागाने अनेक बदल करून नागरिकांची व वाहनचालकांची वाहतुक कोंडीतून सुटका केली आहे. येथील भूमकर चौकातील दुहेरी रस्ता बंद करण्यात आला. त्यांनतर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोठी मोहीम राबविली. फटाक्याचे आवाज व मोठ्या आवाजात हॉर्न वाजविनाऱ्या बुलेटवर कारवाई केली. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरना या मार्गात बंदी घालण्यात आली आहे. सयाजी अंडरपास ते सूर्या हॉस्पिटल अंडरपास हा सेवा रस्ता एकेरी करण्यात आला. थेरगाव १६ नंबर चौकात महापालिका अतिक्रमण विभागाच्या साहायाने सलग चार दिवस अतिक्रमण कारवाई करूचौक मोकळा करण्यात आल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.
वाकड हद्दीतील बहुतेक रस्ते आयटी पार्क व मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जातात मात्र हे रस्ते वाहतूक कोंडीमुळे बदनाम असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ते बदल आणि कारवाई सुरू ठेवली आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. अन्य आवश्यक त्या बदलांसाठी महापालिका, एमआयडीसी, ग्रामपंचायत, महामार्ग अथुरीटीकडे पाठपुरावा सुरू आहे.
संदीप जमदाडे सहायक निरीक्षक वाकड वाहतूक विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.