Corona Update - पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा कोरोनाची धास्ती; 24 तासांत शंभरहून अधिक रुग्णांची भर

Corona
Corona
Updated on

पिंपरी - कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्याप नवीन रुग्ण सापडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 120 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख एक हजार  618 झाली आहे. आज 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आतापर्यंत पिंपरीत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 97 हजार 940 झाली आहे. सध्या एक हजार 851 रुग्ण उपचार घेत आहेत. तर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 827 आणि शहराबाहेरील 769 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष पुनावळे (वय 80) येथील रहिवासी आहेत. शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लसीकरण सुरू
पिंपरीतील 710 जणांना शनिवारी लस देण्यात आली. आजपर्यंत 12 हजार 942 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 677 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 174 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 315 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 84 जणांची तपासणी केली. 870 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख 23 हजार 611 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

आज एक हजार 126 संशयित रुग्णालयात दाखल झाले. 803 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 914 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत सहा लाख 33 हजार 994 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 31 हजार 462 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 29 हजार 824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.