Pimpri-Chinchwad Crime : तळेगाव दाभाडेेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी-चिंचवड पोलिसांची नाशिकमध्ये कारवाई; तीन पिस्तूल, आठ काडतुसे जप्त
3 arrested for firing in talegaon dabhade pimpri chinchwad police action in nashik
3 arrested for firing in talegaon dabhade pimpri chinchwad police action in nashikSakal
Updated on

पिंपरी : ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही’, असे म्हणत दहशत माजवून चार ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल व आठ काडतुसे जप्त केली आहेत. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय १८, रा. कातवे रस्ता, तळेगाव दाभाडे), नीरज ऊर्फ दाद्या बाबू पवार (वय १९, रा. वाघिरे वाडा, नेहरूनगर, पिंपरी) व आदित्य नितीन भोईनल्लू (वय २१, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यांच्यासह साथीदारांनी गुरुवारी (ता. २०) रात्री तळेगाव दाभाडे येथील चार ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत माजवली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंडाविरोधी पथक तपास करत होते. दरम्यान त्यांना नाशिकमधून अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली, त्यांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी चार पिस्तूल जप्त

गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात असताना त्यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान आणखी काही शस्त्रे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन पथके तयार करण्यात आली. पहिल्या कारवाईत तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत मंत्रासिटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ओमकार ऊर्फ बंटी दत्ता आसवले (वय २०, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, टाकवे बुद्रुक, ता. मावळ) याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

3 arrested for firing in talegaon dabhade pimpri chinchwad police action in nashik
Pune L3 Pub Case : ‘एल ३’ बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन; तिघांचे रक्तनमुने, इतरांची होणार चौकशी

त्याला बुधवारपर्यंत (ता. २६) न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच यशवंतनगर, तपोधन कॉलनीमधील वराळे रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ केलेल्या कारवाईत तीन पिस्तूल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी आरोपी समर्थ संभाजी तोरणे (वय १९, रा. रिद्धीसिध्दी बिल्डिंग, फ्लॅट नं.२, कात्रज तलावाजवळ, कात्रज) आणि अमन मेहबूब शेख (वय १९, रा. काकडे वस्ती, गल्ली नं.२, सर्व्हे नं.४, कोंढवा) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपींची धिंड

पोलिसांनी आरोपींची सोमवारी (ता. २४) सायंकाळी धिंड काढली. ज्या ठिकाणी गोळीबार करून दहशत माजवली, त्या ठिकाणी त्यांना पायी फिरविण्यात आले. आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.