Malnourished Childrens : पिंपरी-चिंचवड शहरात सव्वातीनशे अतिकुपोषित बालके सापडली

सामान्यतः दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडसारख्‍या ‘पोषक’ शहरातही कुपोषणग्रस्त बालके सापडली आहेत.
Malnourished Childrens
Malnourished Childrenssakal
Updated on

पिंपरी - सामान्यतः दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडसारख्‍या ‘पोषक’ शहरातही कुपोषणग्रस्त बालके सापडली आहेत. चालू वर्षी सर्वेक्षणात २ हजार ८१७ बालके कुपोषित आढळली असून त्यापैकी तब्बल ३२२ बालके अतिकुपोषित आहेत. गेल्या चार वर्षांपासून अशा प्रकारच्या तपासणीत १२ हजार ३५ बालके आढळली आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरांमध्ये कुपोषणाच्या समस्येने तीव्र रूप धारण केले असल्याचे त्यावरून उघड झाले आहे.

दरवर्षी राज्य शासनाकडून कुपोषण निर्मूलनावर हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च होतो. पण, कुपोषणाची तीव्रता कमी होण्याऐवजी ती उत्तरोत्तर वाढत चालली आहे. शहरातील चार वर्षांच्या सर्वेक्षणात १० हजार २४७ बालके ही मध्यम कुपोषित (मॅम) तर, १ हजार १७९ बालके ही तीव्र कुपोषित अशा एकूण १२ हजार ३५ बालके कुपोषणाच्या कचाट्यात असल्याचे दिसून आले आहे.

कुपोषणाची स्थिती गंभीर

अंगणवाड्या बंद असल्याने बालकांच्या आहाराचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दरम्यान, एकात्मिक बाल विकास सेवा विभागांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबतचे सर्वेक्षण केले जाते. बालकांना घरपोच आहार पुरविण्यात येत आहे. यासोबत दर महिन्याला दोन ते तीन वेळा गृहभेटी देऊन बालकांचे वजन घेत, आहार मिळतो की नाही? याची खातरजमा केली जाते. यात २०१९ ते २०२३ पर्यंत ५ वर्षांखालील कमी वजनाची ७४० बालके सापडली आहेत. त्यावरुन कुपोषणाची समस्या शहरी भागात अधोरेखित होते आहे.

पोषण आहार देऊनही कुपोषण

शहरात ७८ झोपडपट्ट्यांत सुमारे ६ लाख लोक राहतात. एकात्मिक बाल विकास सेवा विभागांतर्गत त्यांच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. सध्या ३६१ अंगणवाड्या सुरू असून त्यात सुमारे २० हजार बालके येतात. प्रत्येक अंगणवाडीत मुलांचे वजन आणि उंची तपासली जाते.

या अंगणवाड्यांमध्येच बचत गटांच्या माध्यमातून उपमा, पुलाव, वरण-भात, शेंगदाणा लाडू, केळी, मटकी उसळ, गव्हाची लापशी आणि राजगिरा लाडू अशाप्रकारचे पोषण आहाराचे वेळापत्रक आहे. तरीही दरवर्षी १०० ते ९०० कुपोषित बालके आढळतात, हे विशेष होय.

कोरोना काळात कुपोषित बालकांचा प्रश्‍न उभा राहिला आहे. कुपोषितांचा शोध लागल्यावर त्यांना पोषक आहाराचा पुरवठा करण्यात येतो. अंगणवाडी सेविकांकडून कुपोषितांचा प्रत्येक महिन्याला पाठपुरावा करण्यात येतो. प्रसंगी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात येते.

- सुरेश टेळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.