एका दिवसात ३,४९६ बाटल्या रक्त झाले जमा; खासदार कोल्हेंच्या आवाहनास मोठा प्रतिसाद

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे शिबिर भरविण्यात आले होते.
Vilas Lande
Vilas LandeSakal
Updated on
Summary

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे शिबिर भरविण्यात आले होते.

पिंपरी - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे ४१ ठिकाणी आयोजन केले होते. त्यात तीन हजार ४९६ बाटल्या रक्त जमा झाले. सर्वाधिक प्रतिसाद सहापैकी भोसरी या विधानसभा मतदारसंघात एक हजार २६८ बाटल्या रक्त संकलित झाले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे शिबिर भरविण्यात आले होते. त्याची सुरवात स्वत डॉ. कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे रक्तदान करून केली. नंतर दिवसभरात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर-आंबेगाव, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघात हे शिबिर झाले. त्याला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाने या रक्तदान शिबिरात जशी आघाडी मारली, तशीच ती भोसरीतीलच नेहरूनगर या रक्तदान केंद्रानेही मारली. शिरूरमधील ४० रक्तदान केंद्रापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल ३७३ बाटल्या रक्त नेहरूनगर येथे संकलित केले गेले. भोसरीत १२७२, जुन्नरमध्ये ७७६, शिरूरमध्ये ४७८, आंबेगावात ४७७, हडपसरमध्ये ३९७ आणि खेडमध्ये ९७, असे या विधानसभा मतदारसंघनिहाय रक्तदान झाले. भोसरीतील रक्तदान यशस्वी होण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहूल भोसले, मुुख्यसरचिटणीस विनायक रणसुभे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, दिपक साकोरे, वसंत बोराटे आदींनी परिश्रम घेतले. खासदार डॉ. कोल्हे यांनी दिवसभरात अनेक रक्तदान केंद्रांना भेटी दिल्या. भोसरीतील मोशी आणि इंद्रायणीनगर येथील रक्तदानाचीही त्यांनी पाहणी केली.

प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच

शिबीरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच म्हणून तीन लाखांचा अपघाती खर्च; वैद्यकीय विमा आणि जीवीत हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये देण्यात आले. तसेच; त्याला आजीवन मोफत रक्तही दिले जाणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.