वाकड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी देखील तीन दिवसीय 'हर घर तिरंगा' अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्याचे आव्हान देश वासीयांना केले होते. त्यास प्रतिसाद देत सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांमध्येही मोठा उत्साह स्वातंत्र्यदिनी दिसला.
मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गृहपाल व संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केले नाही. या घटनेच्या निषेधार्थ व राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ अभाविप पिंपरी-चिंचवड महानगराच्या वतीने शासकीय विद्यार्थी वसतीगृहा बाहेर शुक्रवारी (ता. १८) आंदोलन करण्यात आले या प्रकारची कुणकुण लागताच अभाविपचे कार्यकर्ते वसतिगृह आवारात जमा झाले होते.
तत्पूर्वी वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी या घटनेबद्दल चौकशी केली असता, ध्वज लावण्याची आवश्यकता नाही, आपल्याकडे खांब नाही तसेच दोरी उपलब्ध नाही, अशी हास्यास्पद कारणे दिली.
इतकेच काय तर स्वातंत्र्यदिनी वाकड येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल असणारे घोरपडे हे स्वातंत्र्यदिनी वसतिगृह परिसरात फिरकले सुद्धा नाहीत असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेचा खुलासा करण्यासाठी आभाविप पिंपरी चिंचवड महानगरातर्फे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना दोषींवर कारवाई करन्याबाबत निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे, प्रांत सहमंत्री आंनद भुसनर, पिंपरी चिंचवड महानगर मंत्री सिद्धेश्वर लाड, महानगर सहमंत्री श्रेया चंदन, चिराग मोडक, सुजल वाळूंजकर अन्य कार्यकर्ते व शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी इत्यादी या आंदोलनात सहभागी होते.
भारताच्या स्वतंत्र्यदिनी ध्वजारोहण न होन म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचा व राष्ट्रध्वजाचा हा अपमान आहे. त्यामुळे त्या गृहपालची लवकरात लवकर करवाई करुन त्याच निलंबन व त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी आभाविप ची मागणी आहे.
- सिद्धेश्वर लाड महानगर मंत्री अभाविप पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.