चालक वाहकांना चहा कधी

दीड वर्षांपासून भत्ता बंद; पीएमपीकडून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार
PMPML
PMPMLsakal
Updated on

पिंपरी : दिवसभर प्रवाशांची सुरक्षा आणि तिकिटाची रक्कम सांभाळण्याची जबाबदारी चालक-वाहकांवर असते. पूर्ण दिवस फेऱ्या मारल्यानंतर चहाने येणारी तरतरी कर्मचाऱ्यांना कामासाठी ऊर्जा देते. मात्र, दिवसभर हातात मशिन धरणारे वाहक आणि बसचे स्टिअरिंग फिरवणाऱ्या चालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पीएमपी प्रशासनाने केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून चहाचा अवघा २० रुपये भत्तादेखील बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मरगळ आली आहे.

PMPML
विद्यमानांची प्रतिष्ठा पणाला; उमेदवार संख्यावाढीसह चुरस दिसणार

सध्या पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये दहा हजारांच्यावर पीएमपी कर्मचारी कार्यरत आहेत. चालक-वाहक आधीच तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. त्यात कोरोनाकाळात पगारावरही गंडांतर आले. कालांतराने मिळणारा भत्ताही बंद केला. दिवसभराच्या प्रवासादरम्यान चालक-वाहकांना खिशात वैयक्तिक खर्चासाठी रक्कम बाळगता येत नाही. अशावेळी मिळालेला भत्ताच कामी येतो. दररोजचा २० रुपये याप्रमाणे महिन्याकाठी ५०० रुपये २५ दिवसांचे मिळतात. अधिकारी सोडून सर्व कामगारांना हा भत्ता दिला जातो.

PMPML
‘माझ्या खुशीला शोधून द्या’, शोधणाऱ्यास ३ हजारांचे बक्षीस

पीएमपीमध्ये बदली कामगार व कंत्राटी कामगारांची संख्या अधिक आहे. यातील कायम कामगारांना काही प्रमाणात सवलत मिळते. परंतु, बदली वाहक-चालकांचे तुटपुंज्या पगारामुळे हाल होत आहेत. पहाटे चार वाजता बसच्या कर्मचाऱ्यांना घर सोडावे लागते. अशावेळी जेवणाचा डबाही जवळ नसतो. मात्र, सकाळी बस थांब्यावर चहा घेतला तरी काम करण्यास ऊर्जा मिळते, असे चालक-वाहकांचे म्हणणे आहे. परंतु, आता पीएमपी रुळावर येत असून हा भत्ता सुरू करण्यास हरकत नाही, अशी मागणी अनेक कामगार संघटनांनी पीएमपी प्रशासनाकडे केली आहे. नवीन संचालकांनी अद्यापपर्यंत कोणतीही बैठक न घेतल्याने बरेच प्रश्न रेंगाळले आहेत.

घाण भत्ता पण नाही!

पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी ३०० ते ५०० रुपये स्वच्छतेसाठी म्हणजेच घाण भत्ता कामाप्रमाणे देण्यात येतो. पीएमपीमध्ये देखील हे कर्मचारी त्याचप्रमाणे काम करत आहेत. परंतु, कित्येक दिवसांपासून ही मागणी मान्य झालेली नाही. हा घाण भत्ता सफाई कर्मचाऱ्यांना मिळायला हवा, अशी मागणी जोर धरत आहे.

PMPML
एमएनजीएलचे तिन्ही कार्यालय बंद

‘‘दिवसभर वाहन चालवावे लागते. कधी-कधी खूप कंटाळा येतो. झोप झालेली नसते. अशावेळी चहा गरजेचा असतो. तिकिटाची रक्कम सोडून आम्हाला खिशात रक्कम बाळगता येत नाही. भत्ता ठेवता येतो. आम्ही पीएमपी प्रशासनाचा कणा आहोत. आमच्या कामावर प्रशासनाची आर्थिक गणिते ठरत आहेत. भत्त्याची रक्कम किरकोळ आहे. ती मिळायला हवी.’’

- एक चालक

‘‘दोन सप्टेंबरला बोर्ड मीटिंग आहे. त्यामध्ये बरेच विषय चर्चेसाठी असतील. मी आढावा घेतो"

- लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक, पीएमपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.