पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास छापा पडला.
पिपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास छापा पडला. संशयित लिपिकाची व एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. मात्र त्याने कोणत्या कारणासाठी व किती रकमेच्या लाचेची मागणी केली होती, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
तीन वर्षात तिसरा छापा
१) महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात २०२१ मध्ये छापा टाकला होता. त्यात चार कर्मचारी दोषी आढळले होते.
२) गेल्या वर्षी २०२२ मध्ये नगर रचना विभागातील सर्वेअरला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
३) या वर्षातील २०२३ मधील मंगळवारचा पहिलाच छापा आहे.
प्रशासकीय राजवटीतील हा दुसरा छापा आहे.
महापालिकेत २५ वर्षांत ३४ कारवाया
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सातत्याने लाचखोरीची घटना घडत आहेत. १९९७ मध्ये चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथे सदनिकेची नोंदणी करण्यासाठी ३०० रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकारापासून आजपर्यंत पालिकेतील लाचखोरी सुरूच आहे. १९९७ पासून २०२२ या २५ वर्षांत लाचखोरीच्या ३४ कारवाया झाल्या आहेत.
३२ अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. अगदी १०० रुपयांपासून ते १२ लाख रुपयांपर्यंतची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. यातील काहींना सेवेतून काढून टाकण्यात आले, काहींना न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे. महापालिका मुख्यालयातच लाच स्वीकाराताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १७ फेब्रुवारी ते 19 मे 2022 या कालावधीत तब्बल 32 अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी)ने रंगेहाथ पकडले आहे. यामधील काही अधिकारी, कर्मचारी निर्दोष मुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत. तर, एका अधिकाऱ्याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. लाचखोरीच्या प्रकरणामुळे महापालिकेची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.