फिरत्या बसप्रदर्शनाद्वारे नागरिकांना बसने प्रवास करण्याचे आवाहन

पुणे-पिंपरी चिंचवड हे पुर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे.यात आता अगणित वाहनांची भर पडल्याने स्वच्छ सुंदर पुण्याची हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे.
Bus Exhibition
Bus ExhibitionSakal
Updated on
Summary

पुणे-पिंपरी चिंचवड हे पुर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे.यात आता अगणित वाहनांची भर पडल्याने स्वच्छ सुंदर पुण्याची हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे.

जुनी सांगवी - पुणे-पिंपरी चिंचवड हे पुर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे.यात आता अगणित वाहनांची भर पडल्याने स्वच्छ सुंदर पुण्याची हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे. प्रदुषण मुक्त शहर करण्याची संकल्पना घेवून पीएमपीएलच्या वतीने नागरिकांना बसने प्रवास करण्याचे आवाहन करत पुरविल्या जाणा-या सेवा सुविधांबाबत माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहरात फिरत्या बससेवा प्रदर्शनांना द्वारे माहीती देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात एक व पुणे शहरात एक अशा दोन बसद्वारे उपनगरातील विविध भागात या बस उभ्या करून नागरिकांना बसच्या सुविधा व ईतर गोष्टींबाबत माहीती देण्यात येत आहे. बसच्या आतील भागात याबाबत सविस्तर माहिती फलक, मार्ग, सेवा सुविधा बाबत आकर्षक माहीतीची सजावट करण्यात आली आहे.

यात बससेवेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतचा सर्व इतिहास प्रतिकृती द्वारे दाखविण्यात आला आहे. सद्यस्थितीत ८ लाख ६४ हजार नागरिक बसने प्रवास करतात. तर प्रासंगिक करार, विशेष विद्यार्थी सेवा, पुष्पक बससेवा, अटल शटल, मेट्रो शटल, अभिबस, रातराणी अशा विविध सेवा पुरवणा-या नागरिकांना माहिती नसणा-या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांचाही या प्रदर्शनातून माहीती घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. असल्याचे कर्मचारी विकास सुतार, व आप्पा पवार हे नागरिकांना तोंडी माहीती देवून बसच्या विविध सेवा सुविधा समजावून सांगतात.

- १९५० ला पीएमटीची स्थापना होवून बसची सुरूवात झाली.

- १९७४ साली भोसरी ते पिंपरी पहिली बस सुरु झाली.

- सध्या प्रतीदिन १ कोटी २५ लाखांचे उत्पन्न.

- २०२५ पर्यंत सर्व ईबस (ईलेक्ट्रीकल) करण्याचा उद्देश

- सुरक्षितेच्या दृष्टीने एकावेळी चाळीस प्रवाशांची वाहतूक.

- महिलांसाठी सुरक्षितता व बैठक व्यवस्था-

- वातानुकूलित बस, आरामदायी प्रवास.

प्रदुषणमुक्त शहरासाठी नागरिकांनी शहरांतर्गत बसनेच प्रवास करावा. यामुळे शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी मदत होईल. याचबरोबर पैशाची व इंधनाची बचत देखील होण्यास मदत होईल. असे या फिरत्या बसप्रदर्शनाद्वारे नागरिकांना सांगण्यात येत आहे.ध्वनिक्षेपकावरून माहीती देत बुधवार ता.२५ पासून संपूर्ण पिंपरी शहरात हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()