Kirtan Mahotsav : चिंचवडमध्ये उद्यापासून ‘नाचू कीर्तनाचे रंगी’; आषाढी वारीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवाचे शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाचला नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.
Nachu Kirtanache Rangi
Nachu Kirtanache Rangisakal
Updated on

पिंपरी - नवविधा भक्तीतील एक प्रकार म्हणजे कीर्तन. वारकरी संप्रदायात कीर्तनाला विशेष महत्त्व आहे. भगवंताचे नामस्मरण करणे, भजन करणे, अभंगांचे निरूपण करणे याचा अंतर्भाव कीर्तनात होतो. संतांच्या अभंगांचे निरूपण कीर्तनातून केले जाते. असा कीर्तन सोहळा अर्थात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन ‘सकाळ’ने आषाढी वारीनिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारपासून केले आहे.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सखल संतांचे पायी पालखी सोहळे पंढरपूरकडे निघाले आहेत. ‘पंढरीची वारी चुकू नेदी हरि।’ अशी विनवणी करत वारकरी त्यात सहभागी झाले आहेत. मात्र, नोकरी, व्यवसायामुळे इच्छा असूनही अनेकांना आषाढी वारीत जाणे शक्य होत नाही.

त्यांच्यासाठीच ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवाचे शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाचला नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. त्यानंतर त्यांची कीर्तनसेवा होईल. बुधवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता महोत्सवाचा समारोप होईल. वस्रकला पैठणी आणि सिल्क सारीज् हे सहप्रायोजक आहेत.

कीर्तन महोत्सवाविषयी वारकरी म्हणतात...

आषाढी वारीनिमित्त ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हा ‘सकाळ’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सव एक स्तुत्य उपक्रम आहे. पंढरपूरच्या वारीला जाऊ न शकलेल्या शहर परिसरातील भाविकांसाठी कीर्तन महोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी आहे. या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम ‘सकाळ’ राबवत आहे.

- बब्रुवाहन महाराज वाघ, ज्येष्ठ कीर्तनकार, जुनी सांगवी

पंढरपूरच्या वारीप्रमाणे ‘सकाळ’च्या कीर्तनवारीचे वेध भाविकांना लागले आहेत. कारण कीर्तन महोत्सवाला उपस्थित प्रत्येक भाविकाला प्रत्यक्ष वारीची अनुभूती येते. या वारीत अखंड दोन तास भक्तीचा महापूरच असतो. नामघोष, फुगड्यांचा आनंद असतो. कीर्तनाचा आनंद तरुणाईला यातून मिळणार आहे. प्रत्येक एकादशीला ‘सकाळ’ने हा उपक्रम घ्यावा. त्यानिमित्ताने संप्रदायाची खरी ओळख येणाऱ्या पिढीला होईल.

- विद्याताई काशीद, संत साहित्याच्या अभ्यासक, इंदोरी

कीर्तनांची वेळ आणि कीर्तनकार

  • शनिवार, ता. १३ - सायंकाळी ५ - नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक

  • रविवार, ता. १४ - सायंकाळी ५ - पैठण येथील कीर्तनकार आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगिराज महाराज गोसावी

  • सोमवार, ता. १५ - सायंकाळी ५ - पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे

  • मंगळवार, ता. १६ - सायंकाळी ५ - आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील

  • बुधवार, ता. १७ - सकाळी १० - आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे

काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?

  • काय? - ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव

  • कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह

  • कधी? - १३ ते १७ जुलै २०२४

  • केव्हा? - १३ ते १६ जुलै सायंकाळी ५ वा.

  • १७ जुलै सकाळी १० वा.

  • कसे? - प्रवेश विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क

शिवम - ९३०७७१५९०३, अक्षय - ९५६१३१४६७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.