Pimpri Crime : महिला सहाय्यक फौजदाराला मारहाण; दोघे अटकेत

कारवाई केल्याने दुचाकीस्वाराने चिडून जात वाहतूक शाखेच्या महिला सहायक फौजदाराला मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथे घडला.
Crime
Crimesakal
Updated on

पिंपरी - कारवाई केल्याने दुचाकीस्वाराने चिडून जात वाहतूक शाखेच्या महिला सहायक फौजदाराला मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

उमाकांत उर्फ महादू भगवान वाघमारे (वय २०, रा. जगताप नगर, थेरगाव, मूळ बीड), स्वप्नील धम्मपाल गाडे (वय २२, रा. पिंपरी गाव, मूळ सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या सहायक फौजदार महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शगुन चौक येथे फिर्यादी या कर्तव्यावर होत्या. पिंपरी कॅम्प येथील वाहतूक कोंडी सुरळीत करीत असताना विनापरवाना वाहन चालविल्याप्रकरणी त्यांनी एका दुचाकीवर कारवाई केली. त्यावरून दुचाकी चालकाने फिर्यादीशी हुज्जत घातली.

‘मी पण तुमच्याकडे बघून घेतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर, दुचाकीस्वार मुलाचा मित्र उमाकांत वाघमारे याने फिर्यादी यांच्या डाव्या कानावर जोरात फटका मारला. यामध्ये फिर्यादी यांच्या कानाला दुखापत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.