पिंपरी - चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघांत बंडखोरांमुळे बहुरंगी लढती होतील, असे चित्र आठ दिवसांपूर्वी होते. मात्र, बंडखोरांनी ‘तलवारी म्यान’ केल्याने दुरंगी लढतींवर निवडणूक पोहोचली आहे. तीनही मतदारसंघांत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून चिंचवड व भोसरीत भारतीय जनता पक्ष आणि पिंपरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध महायुती असेच चित्र उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आहे.