सावधान..! गर्भपाताच्या गोळ्या घेताय

गर्भधारणा असलेल्या स्त्रीला मोठी जोखीम होण्याचा धोका यातून होवू शकतो असे स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे.
औषधी गोळ्या
औषधी गोळ्याsakal
Updated on

पिंपरी : गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे गर्भपाताची औषध विक्री सर्रास नामाकिंत वेबसाइटवर व ऑनलाइन सुरु आहे. या बेकायदा औषधांच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नाही. मेडीकलमध्येही दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व प्रिस्किप्शनशिवाय सर्रास मिळत आहेत. गर्भधारणा असलेल्या स्त्रीला मोठी जोखीम होण्याचा धोका यातून होवू शकतो असे स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. (PCMC News)

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात चारशे ते पाचशे मेडीकल व्यावसायिक आहेत. तरुण-तरुणींच्या हातून नकळत होणाऱ्या चुकांमधून महिलांना गर्भपाताची नाइलाजास्तव वेळ येत आहे. सोनोग्राफी करुन छुप्या पद्धतीने गर्भपात करणे कायद्याने चुकीचे असल्याने गर्भपात औषधांच्या माध्यमातून गर्भपाताचा पर्याय महिला स्वीकारत आहेत. बऱ्याच अल्पवयीन महिलांचा यामध्ये समावेश आहे. गर्भपातासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे अवलंबन करणे आवश्यक आहे. एमटीपी ॲक्टनुसार या मेडीसीनविक्रीला बंदी आहे. स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या मेडीसीन सर्रासपणे महिला घेत असल्याचे समोर आले आहे.

औषधी गोळ्या
शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मांचा फोटो

महिलांना चुकीच्या गर्भपाताच्या औषधांमुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होण्याचा संभव आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आठ आठवड्याच्या आतमध्ये गर्भ असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली जाऊ शकतात. पंरतु, त्यापुढे ही औषधे घेणे सर्वात मोठी रिस्क आहे. यामध्ये औषधांची गुणवत्ता पडताळणी करणे गरजेचे आहे. त्याचबरेाबर ही औषधे घेण्याचे टप्पे व पद्धती माहीत असणे अत्यावश्यक आहे. यामुळे अर्धवट गर्भ राहण्याचा धोका जास्त उद्भवू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले.

औषधी गोळ्या
खडकवासला धरणातील पाणी होतंय नितळ

गर्भपाताची औषधे ऑनलाइन मिळत आहे. हे चुकीचे आहे. यावर बंदी येणे गरजेचे आहे. नांदेडमध्ये यापूर्वी कारवाई झाली आहे. आपल्याकडेही औषध विक्रीचा गैरप्रकार रोखला जायला हवा. कोणत्याही स्त्रीला गर्भपातापुर्वी तपासण्या करणे आवश्यकच आहे. अन्यथा खूप मोठी जोखीम जीवाशी महिला खेळत आहेत.

-डॉ. राहुल वीर, वीर हॉस्पिटल, तापकीर चौक, काळेवाडी

कायद्याने गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीला बंदी आहे. आत्ताच पुणे विभागात दोन मेडीकलवर गुन्हे दाखल केले आहेत. तीन वर्षाची शिक्षा आहे. असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

-एस. बी.पाटील, सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()