पिंपरी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून गरिबी हटवण्यासाठी लोकांसाठी असलेल्या योजनांची जाहिरातबाजी केली जात आहे. दिवाळीच्या तोंडावर लाभार्थी मात्र, प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ या योजनेअंतर्गत वृद्ध, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, कुष्ठरोगी, निराधार, अशा लाभार्थ्यांची अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या योजनांखाली समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत, परित्यक्ता, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा चारशे आणि सहाशे रुपये अर्थसाहाय्य दिले जात होते. सरकारने गाजावाजा करून त्यात वाढ करत ते सरसकट एक हजार रुपये केले. त्यामुळे दरमहा एक हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, त्यांच्या खात्यावर जून महिन्यापासून अनुदानच जमा झाले नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर अशा चार महिन्यांचे अनुदान थकले आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एकदम चार महिन्याचे अनुदान संबंधित लाभार्थींच्या खात्यावर जमा केले होते. परंतु, आता तीन महिन्यांपासून सरकारी पातळीवरून अनुदानच न आल्याने लाभार्थी, वयोवृद्ध व गरजू मात्र, दररोज बँकेत हेलपाटे मारत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय तसेच नोकऱ्याही अडचणीत आल्या आहेत. अनेक विकास योजनांची कामे थंडावली आहेत. लाभार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मंजूर होऊन दोन दोन वर्षे झाली, तरीही नियोजनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वेळेवर जमा केले गेले नाही. दरम्यान, सध्या अनुदान अद्याप सरकारी पातळीवरूनच आले नसल्याने हे लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत तहसील कार्यालयातून पाठपुरावा करण्यात येत आहे. अनुदान प्राप्त होताच संबंधितांच्या खात्यावर ते अनुदान तत्काळ जमा करण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली.
‘संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेद्वारे ज्येष्ठ, दिव्यांग आणि विधवा यांना मिळणारी पेन्शन गेल्या तीन महिन्यांपासून जमा होत नाही. सध्या दिवाळी सण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पेन्शन द्यावी. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे मागणी केली आहे.’
- आनंद बनसोडे, अध्यक्ष, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.