MHADA : म्हाडाच्या तळेगाव दाभाडे प्रकल्पाच्या किमती वाढवल्यामुळे लाभार्थ्यांचे आंदोलन

लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव; सदनिकांच्या किंमती वाढल्याने ग्राहकांची नाराजी
Beneficiaries protest over MHADA Talegaon Dabhade project price hike
Beneficiaries protest over MHADA Talegaon Dabhade project price hike sakal
Updated on

पिंपरी : पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे (म्हाडा) तळेगाव दाभाडेची २०१८ ची सोडती काढण्यात आली होती. त्या सोडतीच्या जाहीरातीत घराची किंमत १४ लाख रुपये होती. मात्र; अचानक म्हाडाने अडीच लाख रुपये वाढवून १६ लाख ५० हजार किंमत केली आहे. परिणामी, संबंधित लाभार्थी सदनिकाधारकांनी पुणे म्हाडा कार्यालयात अधिकाऱ्यांन घेराव घातला आणि जाब विचारला. ‘म्हाडा मंडळ हे महाघोटाळा मंडळ, माफ करा, माफ करा अडीच लाख माफ करा, वाढीव रक्कम देणार नाही, घर आमच्या हक्काचे...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या गृहनिर्माण योजनेत ७९६ घरे आहेत. म्हाडातर्फे २०१८ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात बांधकाम सुरू असलेल्या सुमारे ३०.६७ चौरस मीटर सदनिकेची किंमत १४ लाख रूपये नमूद करण्यात आली होती. ती आता सुमारे १६ लाख ५० हजार रुपये केली आहे. यावर म्हाडाने नमूद केले की, रेरा, जीएसटी,

पार्किंग, पाण्याचा भार, वाढलेले बांधकाम साहित्याचे भाव, वाढलेले मजुरीचे दर आदींमुळे सदनिकेच्या किमतीत वाढ झाली आहे. यासाठी वारंवार लाभार्थी सदनिकाधारक म्हाडा कार्यालयाचे उंबरट झिजवत आहे. मात्र; अचानक किंमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

सामुहिक मागणी

‘आमचे उत्पन्न अत्यल्प असून त्यासोबतच आता गृहकर्जाचे हप्ते आणि मी सध्या राहत असलेल्या घराचे भाडेदेखील मला भरावे लागत आहे. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे सर्व माझ्या कुटुंबासाठी डोईजड होत आहे. मला महारेराच्या मुदतीनुसार ३० जून २०२३ पर्यंत माझ्या हक्काच्या सदनिकेचा ताबा द्यावा अथवा ताबा देईपर्यंत घरभाडे मिळावे’ , अशी सामुहिक मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. गृहकर्जाच्या नियमानुसार ९० टक्के बांधकाम पूर्ण होऊन खरेदीखत किंवा करारनामा होत नाही. तोपर्यंत बँक पुढील हप्ता देण्यास तयार होत नाही, अशी लाभार्थ्यांची तक्रार आहे.

काय आहे प्रकार

लाभार्थी म्हणाले, ‘‘म्हाडा कार्यालयाने प्रत्येक इमारतीनुसार बनवलेल्या ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपवर बेनामी असलेले एक पत्रक पोस्ट केले होते. ज्यात सुधारित रक्कम म्हणून २.५ लाख रक्कम वाढवून सांगून गॅलरी हे वाढीव क्षेत्र असल्याचे दाखविले होते. यासंदर्भात कोणताही सदनिकाधारक वाढीव २.५ लाख रुपये रक्कम भरण्यास अजिबात तयार नाही.

कारण गॅलरी या वाढीव क्षेत्राबद्दल लाभार्थ्यांपैकी कोणाही सदनिकाधारकास काहीही पूर्वकल्पना न देता म्हाडाच्या मर्जीनुसार हा निर्णय आम्हा सदनिकाधारकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तो आम्हा सर्वांना अजिबात मान्य नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्लॅननुसार गॅलरी ही सदनिकेत आधीपासूनच आहे आणि सॅम्पल फ्लॅटमध्येसुद्धा एकूण क्षेत्र तेवढेच असून गॅलरीदेखील आहे. इमारत बांधणी नियमानुसार गॅलरीशिवाय इमारत होऊच शकत नाही, याबाबत म्हाडाने स्पष्ट करावे.

या आहेत मागण्या

- सदनिकेचा ताबा रेराच्या नियमाप्रमाणे असलेल्या मुदतीत देण्यात यावा.

- योजना आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असून त्यास केंद्र सरकारचे (पंतप्रधान आवास योजना) अनुदानदेखील द्यावे.

- वाढीव एरिया तसेच वाढीव रक्कम रद्द करावी, तसेच शेवटचा संपूर्ण हप्ता माफ करावा.

- एकूण १० टक्के रक्कम कमी करावी.

- त्याचबरोबर महारेरा नियमानुसार वेळेत ताबा द्यावा.

- ताबा देईपर्यंत लाभार्थ्यांना घरभाडे द्यावे.

‘तळेगाव दाभाडे प्रकल्पातील सदनिकांच्या किमतीत अडीच लाखाची वाढ केली. त्यामुळे लाभार्थ्यांनी वाढीव किंमत माफ करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले आहे. याबाबत प्रस्ताव तयार करून म्हाडाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. पुढील दहा दिवसात निर्णय घेण्यात येईल.’’

- दिनेश श्रेष्ठ, कार्यकारी अभियंता, म्हाडा, तळेगाव दाभाडे प्रकल्प.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()