पिंपरी - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भोसरी मतदारसंघातून रविवारी उमेदवारी जाहीर केली. ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. विजयी झाल्यास त्यांची हॅट्ट्रिक साधली जाईल. शिवाय महायुतीचे सरकार आल्यास मंत्रिपदाची संधीही त्यांना मिळू शकते.