पिंपरी - महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भोसरी विधानसभा आपल्यालाच सुटावा, अशी मागणी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षात पेच निर्माण झाला होता. अखेर शिवसेना ‘उबाठा’ पक्षाने भोसरीचा दावा सोडला आणि रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची उमेदवारी जाहीर केली.