भोसरीतील विद्युत रोहित्राला आग; आगीच्या ज्वाळा चाळीस फुटापर्यंत

शांतिनगमधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या विद्युत रोहित्राला बुधवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागली.
Fire
FireSakal
Updated on

भोसरी : येथील शांतिनगमधील विठ्ठल मंदिराजवळ (Vitthal Temple) असलेल्या विद्युत रोहित्राला बुधवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागली. आगीच्या ज्वाळा सुमारे चाळीस फुटापर्यंत वर पोचल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) भोसरी अग्निशमन केंद्राने फोमचे तीन केन वापरून ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने पुढील धोका टळला.

भोसरीतील शांतिनगमधील हे विद्युत रोहीत्र रस्त्याला लागूनच आहे. या रस्त्यावर पादचाऱ्यांसह वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. या विद्युत रोहीत्राला लागूनच लघुउद्योगही आहेत. असे असतानाही या विद्युत रोहीत्राला संरक्षक पत्रे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विद्युत रोहीत्राचा स्फोट झाला असता तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे या विद्युत रोहीत्राला सरक्षक पत्रा लावण्याची मागणी वाहन चालक आणि लघुउद्योजकांनी केली आहे.

Fire
अकोला : ठाणेदारासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणारे आरोपी निर्दोष

महावितरणच्या भोसरी विभागातील सहायक अभियंत्या वैशाली जगताप यांनी या विषयी सांगितले की शांतिनगरमधील विद्युत रोहीत्रावर अधिकचा लोड नाही. त्याचप्रमाणे हे विद्युत रोहीत्र चांगल्या स्थितीत आहे. मात्र विद्युत रोहीत्राने पेट घेतल्याचे कारण विद्युत रहीत्राची तपासणी केल्यावर समजून येईल. तर एका कर्मचाऱ्याने सांगितले की या विद्युत रोहीत्रामधून तेल गळतीमुळे पेट घेतल्याची शक्यता आहे.

आगीची खबर करताच भोसरी अग्निशन केंद्रातील लिडींग फायरमन संदेश ठाकूर, श्रावण चिमटे, विठ्ठल भुसे, निखील गोगवले आदीं अग्निशमन गाडीसह दाखल झाले. त्यांनी ही आग तीन फोन केनच्या सहाय्याने पाऊण तासात आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.