भाजपकडून आयुक्त टार्गेट; राष्ट्रवादीकडून पाठराखण

कोरोना व लॉकडाऊन काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेने गेल्या महिन्यात घेतला होता.
PCMC
PCMCSakal
Updated on

पिंपरी - कोरोना (Corona) व लॉकडाऊन (Lockdown) काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेकडुन (Municipal) तातडीची मदत (Help) म्हणून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समिती (Standing Committee) सभेने गेल्या महिन्यात घेतला होता. मात्र, महापालिका अधिनियमानुसार अशी मदत देता येणार नसल्याचे आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी स्पष्ट केले होते. त्यावरून शुक्रवारी (ता. १८) सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी (BJP Corporator) आयुक्तांना धारेवर धरले तर, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठराखण केली. मात्र, आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी केली. (BJP Commissioner Target Politics NCP Support)

कोविडमुळे आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबावर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा विषय स्थायी समिती सभेने मंजूर केला आहे. यामुळे शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर आदी सुमारे ४० हजार कुटुंबीयांना लाभ मिळणार होता. मात्र, आयुक्तांनी संबंधित ठरावावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा अभिप्राय मागविला. त्यानंतर, 'महापालिका अधिनियमानुसार मदत देता येणार नाही,' असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

PCMC
अनेक शाळांची नव्या प्रयोगासहित ‘ऑनलाइन’ शाळा

मदतीच्या चर्चेवर भाजपच्या शारदा सोनवणे, विकास डोळस, झामाबाई बारणे, नितीन काळजे, उषा मुंढे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे, मनसेचे सचिन चिखले यांनी सहभाग घेतला. पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी, ''कायद्याच्या चौकटीत राहून मदत करता येईल का?, याबाबत अभ्यास करा व पुढच्या बैठकीपर्यंत मदत मिळेल, असे काम करा,''असा आदेश आयुक्तांना दिला.

भाजप पदाधिकारी म्हणाले....

राहुल जाधव : रिक्षा चालक, बांधकाम मजूर आदींना मदत होणार.

अंबरनाथ कांबळे : आम्हाला आयुक्तांनी वेड्यात काढले.

अनुराधा गोरखे : मदतीबाबत नागरिकांना आम्ही काय उत्तर देणार.

बाबासाहेब त्रिभुवन : कष्टकऱ्यांची अवहेलना सुरू आहे.

हर्षल ढोरे : मदत न देण्याचे कारण सांगावे.

ज्ञानेश्वर थोरात : मानवतेच्या दृष्टीने मदत करावी.

आशा शेंडगे : लोक आम्हाला विचारत आहेत, विरोधक बदनामीचे फ्लेक्स लावत आहेत

सीमा सावळे : आयुक्त राजकारण करत आहेत.

नामदेव ढाके : सर्व सामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम आयुक्तांनी केले आहे.

विरोधक म्हणाले....

राष्ट्रवादी काँग्रेस

योगेश बहल : आयुक्तांवर आरोप करू नये, कायद्यातील तरतूद पहावी.

भाऊसाहेब भोईर : शाब्दिक राजकारण करू नका. मदतीबाबत विचार करावा.

राजू मिसाळ (विरोधी पक्षनेते) : आयुक्तांना थोडा वेळ द्या, ते योग्य निर्णय घेतील.

राहुल कलाटे (शिवसेना गटनेते) : देशाच्या वाघाने सांगितलेले पंधरा लाख व महापालिकेचे तीन हजार रुपये मिळावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()