पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला झटका बसला आहे. कारण भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि प्रवक्ते राहिलेले एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी मुंबईत मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधलं. (BJP on backfoot in Pimpri Chinchwad big leader Eknath Pawar enters into ShivSena Thackeray group)
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या प्रमुखपदावर काम करण्याची मोठी जबाबदारी एकनाथ पवार यांच्या खांद्यावर होती. त्यांचं मूळ गाव हे नांदेडमधील लोहा हे आहे. त्यामुळं त्यांचा त्या भागातही चांगला संपर्क आहे. (Latest Marathi News)
पण पक्षांतर्गत राजकारण आणि संघटनेत डावललं जात असल्याची भावना असल्यानं ते नाराज होते. त्यामुळं त्यांनी नुकतीच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती, त्याचवेळी ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
आपल्याकडं काहीही नसताना एकनाथ पवार यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं मी त्यांचं शिवसेनेत स्वागतच करतो. आता त्यांनी नांदेड आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काम करावं, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांच्यावर संघटकपदाची जबाबदार देण्यात आली आहे.
नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्याविरोधात एकनाथ पवार यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आपल्याला लोहा कंधारच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं इथून विधानसभेची उमेदवारीही त्यांना दिली जाऊ शकते. दरम्यान,एकनाथ पवार यांच्यासह युवा मोर्चाचे चेतन पवार यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.