लातूरच्या डॉक्टरचा वाकडला संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या लातूर येथील डॉक्टरचा मृतदेह वाकड येथे संशयास्पद अवस्थेत आढळला.
crime
crimesakal
Updated on
Summary

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या लातूर येथील डॉक्टरचा मृतदेह वाकड येथे संशयास्पद अवस्थेत आढळला.

पिंपरी - दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या लातूर येथील डॉक्टरचा मृतदेह वाकड येथे संशयास्पद अवस्थेत आढळला. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. मात्र, ही आत्महत्या, घातपात की अपघात याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

डॉ. संजय शेळके (वय ३७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेळके हे मूळचे लातूर येथील असून दोन दिवसांपूर्वीच शहरात येथे आले होते. बाणेर एका लॉजमध्ये राहत होते. दरम्यान, सोमवारी सुमारास वाकड येथील देहूरोड -कात्रज बाह्यवळण मार्गावरील लाईफ पॉईंट हॉस्पिटल समोरील रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या संपूर्ण शरीराला गंभीर जखमा होत्या. त्यांच्याकडे चिट्ठी सापडली आहे. त्यामध्ये 'मी जे कृत्य करतो, त्यास मी जबाबदार आहे', मुलांना व्यवस्थित सांभाळा, ज्याला पैसे द्यायचे आहेत ते देऊन टाका' असे नमूद आहे.

दरम्यान, प्रथमदर्शनी आत्महत्या दिसत असली तरी अपघात, घातपात आहे का याचाही तपास सुरु असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.