पिंपरी चिंचवडकरांनो...'नो-व्हॅक्सीन नो एंट्री'!

‘ नो-मास्क, नो एंट्री, नो-व्हॅक्सीन नो एंट्री’ हे धोरण
no vaccine- no mask- no entry
no vaccine- no mask- no entrySakal
Updated on

पिंपरी : कोविड आणि ओमायक्रॉनचा पिंपरी-चिंचवड शहरात प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ‘बेक्र द चेन’ अंर्तगत सर्व नागरिकांना लसीकरणाचे दोन डोस झाल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा. ‘ नो-मास्क, नो एंट्री, नो-व्हॅक्सीन नो एंट्री’ हे धोरण अवलंबवावे, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. तसेच आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे.(No Vaccine No Entry)

no vaccine- no mask- no entry
पुणे : सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ लाखांना गंडा

सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, खासगी व सरकारी कार्यालये, बँका, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार, मॉल, इतर आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस झाल्याची खातरजमा करावी. लसीकरण प्रमाणपत्रासह माहिती ठेवावी तसेच सर्वसामान्यपणे काही अपवादात्मक परिस्थिती, अति तातडीची बाब वगळता आस्थापना, कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांनाही लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा, नो-मास्क, नो एंट्री, नो-व्हॅक्सीन नो एंट्री हे धोरण अवलंबवावे, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

no vaccine- no mask- no entry
पुणे : ड्रोन कँमेरा वापरताय सावधान, 'यांची' परवानगी आवश्यक!

उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५०

बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा ५० करण्यात आली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबर२०२१च्या रात्री१२ पासून अंमलात येणार आहेत. अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.