Pune : भारताला बुद्धांच्या शांतीच्या मार्गाची गरज - अजित गव्हाणे

जाती-धर्माची व्यवस्था माणसामाणसांमध्ये तेढ निर्माण करणारी व्यवस्था
caste-religion system discord among people India Needs Buddha s Way of Peac  Ajit Gavane
caste-religion system discord among people India Needs Buddha s Way of Peac Ajit Gavanesakal
Updated on

भोसरी – जाती-धर्माची व्यवस्था माणसामाणसांमध्ये तेढ निर्माण करणारी व्यवस्था आहे. म्हणूनच जाती-धर्माची बेडी झुगारली पाहिजे. भारताला पुढे नेण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी दाखविलेल्या शांततेच्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरीत व्यक्त केले.

स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे भोसरीतील संत तुकारामनगरातील तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी ज्येष्ट नगरसेवक वसंत लोंढे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, माजी विरोधी पक्षनेते सखाराम डोळस, देवेंद्र तायडे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

या वेळी माजी नगरसेवक विकास डोळस, अनुराधा गोफणे, भाऊसाहेब डोळस, दीपक डोळस, अमोल डोळस, देविदास गोफणे, अमर फुगे, राजेंद्र डोळस, पंकेश डोळस, चंद्रकांत डोळस, बांबू नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सिद्धार्थ पवार यांनी भूषविले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गव्हाणे यांना 'आदर्श समाजसेविका पुरस्कार २०२३' तर शालनबाई गोतारणे यांना 'आदर्शमाता २०२३' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या वेळी वंदन महामानवाला हा भीम गीतांचा कार्यक्रम झाला. यामध्ये गायक प्रविण डोणे, कोमल तेंडुलकर, सार्थक शिंदे आदींनी भीम गीते गाऊन कार्यक्रमात रंग भरला. डाॅ. सत्यजीत कोसंबी यांनी प्रबोधन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला मंचचे अध्यक्ष प्रकाश डोळस, अप्पा शिंदे, दिनेश पहुरकर, किरण आनंदराव डोळस, राजेश थोरात, गुणवंत नाखले, संतोष धनेश्वर, धम्मपाल गायकवाड, धम्मपाल गायकवाड, प्रभाकर माने, राजेश डोळस आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाचपुते यांनी केले. तर आभार जयभारत कुंभारे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.