कोरोना लस न घेताच पिंपरीत मिळते प्रमाणपत्र

तांत्रिक प्रणाली बिघाडाचा फायदा; घेतले जातात दीड हजार रुपये
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Updated on

पिंपरी : नोकरीनिमित्त तसेच, परराज्यात जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी अँटिजेन (antigen) व आरटीपीसीआर (RTPCR) तपासणीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले जात असल्याचे समोर आले होते. तसाच प्रकार लसीकरण प्रमाणपत्राबाबत घडत आहे. लस टोचून देण्यासाठी खासगी व सरकारी दवाखान्यांना परवानगी मिळाली. परंतु, काही जणांना तांत्रिक प्रणालीतील बिघाडामुळे लस टोचून न घेताच किंवा नोंदणी न करताच प्रमाणपत्र मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी काहीजण हजार ते दीड हजार रुपये मोजत असल्याचे समोर आले आहे. (Certificate obtained Pimpri without taking corona vaccine ass97)

corona vaccination
नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरात आतापर्यंत हजारो नागरिकांनी लशीचे डोस घेतले आहेत. लसीकरण केंद्रांवर पहाटेपासून लांबच्या लांब रांगा नागरिकांनी लावल्या. परंतु, परदेशात शिक्षण व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांसाठी दुसऱ्या लाटेपासून कठोर नियमावली लावली गेली. ऑनलाइन नोंदणी केल्यावरही बऱ्याच जणांना कागदपत्रांअभावी अडचणी निर्माण होत होत्या. काही जणांना अतितत्काळ लस हवी होती. यातील बरेच जण खेळाडू होते, तर काही जण विविध कामांसाठी परदेशात जात होते.

corona vaccination
पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

लशीचे प्रमाणपत्र अत्यावश्यक असणाऱ्यांना महापालिकेने ‘मी जबाबदार’ या ॲपवर नोंदणी करावयास सांगितले होते. परदेशी जाणाऱ्यांसाठी एक जूनपासून शहरात नोंदणी सुरू झाली. जिजामाता रुग्णालयात या सर्वांसाठी दर शनिवारी सोय केली गेली. यासाठी डीएस १६० फॉर्म व व्हिसा गरजेचा होता. बऱ्याच जणांना जून-जुलै महिन्यामध्येच शालेय शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. काहींकडे कमी अवधी होता. परंतु, ४५ वर्षांच्या आतील सर्वांना कागदपत्रांची पूर्तता करणे भाग होते. त्यामुळे, लशीचे प्रमाणपत्र मिळवले गेले. परंतु, यावर महापालिका प्रशासनाचा वचक नसल्याने आता लसीकरण प्रमाणपत्रातही सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लशीचा सावळा गोंधळ

कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लशीच्या डोसमधील अंतराचे नियमही वारंवार बदलत होते. लशीच्या दोन डोसमध्ये २८ व ८४ दिवसांचे अंतर अत्यावश्यक होते. परंतु, बऱ्याच जणांना या नियमांच्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांनी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडाचे दाखले देत, तसेच इतर कारणे सांगून खासगी दवाखान्यामधून डोस न घेताच प्रमाणपत्र घेतले. काहींच्या मोबाईलवर लस घेतल्याचे संदेशही थेट जात आहेत, तर काहींनी नोंद न करता लशीचे प्रमाणपत्र मिळविले असल्याची काही डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()