Swimming Tank : चऱ्होली, वडमुखवाडी मधील अद्ययावत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव एप्रिलपासून सुरू

चऱ्होलीतील वडमुखवाडी उपनगरामध्ये साकारत असलेल्या प्रशस्त रस्त्याबरोबरच जलतरण तलाव यांसारखे समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
shri sant dnyaneshwar maharaj swimming tank
shri sant dnyaneshwar maharaj swimming tankSakal
Updated on
Summary

चऱ्होलीतील वडमुखवाडी उपनगरामध्ये साकारत असलेल्या प्रशस्त रस्त्याबरोबरच जलतरण तलाव यांसारखे समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले आहेत.

मोशी - चऱ्होलीतील वडमुखवाडी उपनगरामध्ये साकारत असलेल्या प्रशस्त रस्त्याबरोबरच जलतरण तलाव यांसारखे समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले आहेत. महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 चऱ्होली उपनगरांमध्येही स्थानिक तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने वडमुखवाडी येथील सर्वे नंबर 131 येथील आय.टी.आर.च्या बदल्यात आलेल्या महापालिकेच्या सुविधा भुखंडावर बांधण्यात आलेला अद्ययावत असा जलतरण तलाव उभारण्यात आला आहे.

मात्र तो तयार झाल्यापासून किमान एक वर्षाहून अधिक काळ विविध दुरुस्तीच्या कामांसाठी बंद होता. तो सुरु व्हावा म्हणून स्थानिक माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार हा जलतरण तलाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी आहेत वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज या अद्ययावत अशा जलतरण तलावाची वैशिष्ट्ये...

* आळंदी-पुणे बीआरटीएस व पालखी मार्गालगत हाकेच्या अंतरावर...

* चोविसावाडी येथील वडमुख वाडीतील सर्वे नंबर 5 मधील सर्वे नंबर 131 मध्ये...

* एकुण खर्च : 3 कोटी 49 लाख 87 हजार 156 रुपये.

* भुखंड क्षेत्रफळ : 62 हजार चौ. मीटर

* जलतरण तलावाची एकुण क्षेत्रफळ

* लांबी : 25 मीटर...

* रुंदी : 16 मीटर

* खोली : 2.10 मीटर

shri sant dnyaneshwar maharaj swimming tank
MLA Ashwini Jagtap : चापेकर वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यानुसार विकास करा

* तलावासाठी आवश्यक असलेला फिल्ट्रेक्शन प्लांट...

* बांधकाम : ऑलिंपिक पध्दतीचे...

* महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन व कपडे बदलण्याची व्यवस्था...

* प्रशस्त तिकीट व प्रतिक्षा खोली...

* टेन्साईल रफींग पद्धतीचे शेड...

* दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्कींग...

* सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षारक्षक ...

चऱ्होली- वडमुखवाडी येथील नागरिकांसाठी हा अद्ययावत असा जलतरण तलाव दुरुस्त्यांसह बांधून पूर्ण झालेला आहे. सध्या त्यामध्ये काही चाचण्या सुरु आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तो खुला करण्यात येईल.

- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग. पिंपरी-चिंचवड महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.