चिखली - मोई इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली; पिंपरी चिंचवड महापालिकेत जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

The road leading to Pimpri Chinchwad Municipal Corporation is closed for traffic: खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र आज दुथडी भरून वाहू लागले. मोई येथील चिखली - मोई इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने मोई गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाणाऱ्या रस्त्याच्या संपर्क तुटला
chikhali- Moi Indrayani River Bridge Under Water
chikhali- Moi Indrayani River Bridge Under WaterSakal
Updated on

कुरुळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र आज दुथडी भरून वाहू लागले. मोई येथील चिखली - मोई इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने मोई गावाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाणाऱ्या रस्त्याच्या संपर्क तुटला बुधवारी दि. २४ दुपारी बारा दरम्यान पुलावर पाणी आले.

गेल्या दोन दिवसापासून मावळ,खेड,हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीच्या दोन्ही बाजूने शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.

मोई,कुरुळी, चिंबळी आदी नदी काठच्या गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने महाळुंगे वाहतूक पोलीस विभाग वतीने इंद्रायणी नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला बरिकेट लाऊन रस्ता बंद करून वाहतूक चिंबळी फाटा पुणे-नाशिक महामार्ग व निघोजे मार्गी तळवडे या बाजूने फिरवली असल्याची माहिती वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी दिली.

मोई गावचे सरपंच शिलाताई संतोष रोकडे, उपसरपंच,पोलीस पाटील , ग्रामस्थांनी माहिती मिळाल्यावर महाळुंगे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी इंद्रायणी नदीच्या पुलावर बरिकेट लाऊन पोलीस कर्मचारी ठेवून बंदोबस्त तैनात केला.इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत झाल्याने पुलावरून पाणी गेल्याने बघायांची मोठी गर्दी परिसरात झाली होती.

चिखली - मोशी परिसरातील इंद्रायणी नदीच्या पात्रात लगत असणाऱ्या रिवर रेसिडेन्सी च्या मागील बाजूस असणाऱ्या घरांचा परिसर जलमय झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या परिसरात आजी-माजी नगरसेवक यांनी पाहणी केली आहे.

- किशोर चव्हाण सहायक अभियंता मोशी पाटबंधारे शाखा, मोशी.

वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी (इंद्रायणी नदी) पात्रामध्ये 2172 कुसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी.

तरी इंद्रायणी नदीवरील देहू ते तुळापूर या मधील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी पुर परिस्थितीमध्ये इंद्रायणी नदीपात्रामध्ये न जाणे तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूक बंधाऱ्यावरून न करणेबाबत मोशी शाखेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.