वाकड - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठी राजकीय अपडेट समोर येते आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महायुती आणि भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना विरोध करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
निवडणुकीला ते इच्छुक होते, तेव्हाही त्यांनी पक्षाकडे जगताप यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. जगताप यांच्या विरोधात इतरही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली मात्र नंतर त्यांनी जुळवून घेतले पण नखाते यांनी मात्र विरोध कायम ठेवत आज भाजपला राम राम केला.