जुनी सांगवी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू आहे.संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी,भाजपा महायुती व अपक्ष अशी तिरंगी लढत उत्सुकतेचा विषय ठरली.
महाविकास आघाडी व भाजपा महायुती कडून ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.सकाळी थेरगाव येथे मतमोजणीला प्रारंभ झाला.पहिल्या फेरीपासूनच भाजपा उमेदवार अश्विनी जगताप या आघाडी घेत असल्याचे चित्र स्पष्ट होताच पिंपळे गुरव, जुनी सांगवी,नवी सांगवी परिसरातील चौकांमधून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आमदार वहिनी साहेब असे शुभेच्छा फलक झळकले आहेत.
सध्या विसाव्या फेरी अखेर अश्विनी जगताप 71791, नाना काटे : 61540 राहूल कलाटे: 23255 अशी स्थिती असून अजून १६ मतमोजणीच्या १६ फे-या शिल्लक आहेत. चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी जगताप यांनी ही निवडणूक लढवली.
विजयानंतर जल्लोष न करता "भाऊंच्या माघारी..आता आपली जबाबदारी अशा आशयाचा संदेश मतमोजणीच्या पुर्वसंध्येला समाज माध्यांमावर फिरत होता.यात प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, शतशः ऋणी आणि खूप खूप धन्यवाद.
३ जानेवारीला भाऊ गेले. पिंपरी चिंचवड शहर एका लढवय्या नेत्याला मुकले. भाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. लोकनेते भाऊ जाऊन १५ च दिवस झाले असतील, पोटनिवडणूक जाहीर झाली.
दुःखातून पूर्णतः सावरलो नसताना एवढ्या लवकर निवडणुकीला सामोरे जावे लागेल,असे कोणाच्याही मनात नव्हते.पक्षाने निवडणुकीत उमेदवार म्हणून जबाबदारी दिली. पर्वताएवढं दुःख असताना आपण सारे जण आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात.
भाऊंच्या सोबत जसे राहिलात, अगदी तसेच तुम्ही याही निवडणुकीत पूर्ण शक्तिनिशी आमच्या सोबत राहिलात. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि सर्व सहयोगी पक्षांची साथ, भाऊंचे कार्य आणि आपले सर्वांचे पाठबळ यामुळेच आपण ही निवडणूक जिंकणारच आहोत.
फक्त माझी आपणा सर्वाँना विनम्र प्रार्थना आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भंडारा उधळणे, गुलाल उधळणे, फटाके वाजवणे या गोष्टी आपण टाळू या. "श्रद्धांजली लक्ष्मणभाऊंना...मत अश्र्विनिताईंना" हेच तत्व पाळले आहे. " भाऊंच्या माघारी...आता आपली जबाबदारी" यानुसार आपण सारे काम करू या.
पुन्हा एकदा मी आपली शतशः ऋणी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.